महाराष्ट्र

BJP : चंद्रशेखर बावनकुळे झालेत त्यांच्यापुढे नतमस्तक 

Maharashtra Election : कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; मोठ्या यशाला गवसणीची खात्री 

Polling Day : कोणताही कार्यकर्ता हा त्या त्या पक्षाचा पाठीचा कणा असतो. आपल्या नेत्याने पाठीवर हात ठेवत लढ..आपण आहोत, असे म्हणण्याची तेवढी प्रतीक्षा कार्यकर्त्याला असते. ही थाप मिळाली तर सच्चा कार्यकर्ता ‘मर मिटने’साठी देखील तयार असतो. अशात नेताही मोठ्या मनाचा असेल तर मग पार्टी यशाचा मार्गावर सुसाट धावते. असाच प्रत्यय महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना आला आहे. गेले काही दिवस भाजपचे राज्यभरातील कार्यकर्ते सतत धावपळ करीत होते. लोकसभा निवडणुकीचे आव्हान समोर होते. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा संकल्प होता. त्यामुळे कार्यकर्ते तळपत्या उन्हात झटत होते. राज्यातील निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा सोमवारी (ता. 20) आटोपला. मतदान आटोपताच भाजपचा एक मोठा नेता कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक झाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे त्या नेत्याचे नाव. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रात बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न पोहोचल्याचा उल्लेख केला.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला. निवडणूक काळापर्यंत मोठ्या सभांपर्यंत हा प्रवास विस्तारला. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यापक प्रचार केला. विधिमंडळातील भाजपचे सर्व आजी- माजी आमदार प्रचारात कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल बावनकुळे यांनी आभार मानले.

DCM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे 4 जून नंतरची स्थिती तयार करत आहेत

यशाचा विश्वास 

राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची अखंड मेहनत आहे. त्यातून निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालण्याचा विश्वास बावनकुळे यांना आहे. 4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू, असा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केला. पाचव्या टप्प्याचे मतदान आटोपल्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणूक पूर्ण झाली आहे. 20 मे पासून आता 4 जूनपर्यंत निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालासाठी आता सर्वांना 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या 15 दिवसात 360 तास आहेत. मतदान आटोपले असले तरी निकालासाठी 15 दिवस अर्थात 360 तास आहेत. निकालाची घटिका जशी जशी जवळ येणार आहे, तशी तशी सर्वांची धडधड पुन्हा वाढणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!