महाराष्ट्र

Mahayuti : बावनकुळे म्हणतात, ‘दसऱ्यानंतर तिढा सुटेल!’

Chandrashekhar Bawankule : जागावाटपाचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या आठवडाभरात आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व सत्ताधारी आमदारांना आपल्या भागातील भूमिपूजन आणि लोकार्पणाची घाई झाली आहे. याशिवाय इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी मिळणार की नाही, याचा विचार न करता सगळे कामाला लागले आहेत. अशात सत्तेत असलेल्या महायुतीपुढे उमेदवारी देण्यापूर्वी जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होईपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. मात्र हा तिढा दसऱ्यानंतर सुटेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपावर चर्चा झाली आहे, असं सांगितलं जातं. मात्र तसं असतं तर आतापर्यंत चित्र स्पष्ट झालं असतं. एकतर शाह यांनी मांडलेलं गणीत पटलेलं नसावं, याची दाट शक्यता आहे. त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी दसऱ्यानंतर तिढा सुटेल, असं म्हटलं. त्यामुळे नक्कीच मोठा तिढा निर्माण झाला आहे, हेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका महाराष्ट्रात सहन करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खबरदारी घेतली जात आहे. त्याच कारणाने जागावाटप आणि उमेदवारी या दोन्ही पातळ्यांवर एवढा वेळ लागत आहे, हे स्पष्ट आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत’, असं सांगितलं आहे. त्यामुळे जिंकण्याची खात्री असलेल्या जागांचा विचार करूनच जागावाटप आणि उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असं दिसत आहे.

तरच केंद्रातून मध्यस्थी!

जागावाटपाचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संहमतीनेच निर्णय होईल. काही जागांचा प्रश्न सुटला नाही, तरच केंद्रीय नेते मध्यस्थी करतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

Assembly Elections : महायुतीचा मुहूर्त ठरला!

मुख्यमंत्रीच उत्तर देतील

उद्धव ठाकरे यांना अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी होती. एकनाथ शिंदे यांनी युती तुटू नये यासाठी प्रयत्न देखील केले. पण संजय राऊत यांनी खोडा घातला त्यामुळे ते शक्य झालं नाही, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला होता. त्याबद्दल विचारले असता ‘एकनाथ शिंदेच यासंदर्भात उत्तर देतील’, असे बावनकुळे म्हणाले.

भाजपला मजबुती मिळेल

हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये येणारे निकाल भाजपला मजबूती देणारे असतील. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त यश मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचं काम केलं आहे. 370 सारखे कलम हटवण्यात आले. जनतेला संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालं, असं बावनकुळे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!