महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विरोधक सरड्यासारखे

Maharashtra BJP : विकासाच्या बळावर जनतेला मतं मागणार

Assembly Elections : भाजप आणि महायुतीची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे वर्तमान स्थितीपेक्षा जास्त आमदार निवडून येतील, अशी तयारी आहे. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वामध्ये राज्याला भरभरून देत आहे. राज्याचा आणि राज्यातील जनतेचा विकास करीत आहेत. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची गरज आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही जनतेला मतांचं कर्ज मागणार आहोत. पुढच्या पाच वर्षांत विकासाचं पर्व या महाराष्ट्रात आणण्याकरीता बुथस्थरावर आमची संघटना काम करणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेहमीच सरड्यासारखे रंग बदलतो. लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली. त्यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली. आता एका टप्प्यात निवडणूक होत आहे, तरीही विरोधकांचा आक्षेप आहे. विरोधाक टीका करीत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

पराभवाची छाया

विरोधी पक्ष पराभवाच्या छायेत आहेत. स्वतःचा पराभव मान्य करत आहेत. त्यामुळेच ते अशी टीका टिप्पणी करीत आहेत. ते रोज सरड्यासारखे बदलत आहेत. काही ना काही विषय घेऊन वक्तव्य बदलत आहेत. त्यांचा पराभव निश्चित आहे. आता काही दिवसांनी ईव्हीएमवर आरोप केले जातील. निवडणूक आयोगावर टीका होईल. त्यांचे आरोप त्यांना लखलाभ आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

आमच्याकडे विकास कामांची शिदोरी आहे. ती शिदोरी जनतेमध्ये आम्ही घेऊन जाऊ. जनता महायुतीला विजयी करेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या निलंबनावर बोलताना बावनकुळे म्हणाले, पक्षविरोधी कारवाया करणे. पक्षाच्या अंतर्गत विषयाला माध्यमांसमोर आणणे चुकीचे आहे. सार्वजनिक बैठकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही.

Mallikarjun Reddy : नेत्यांची झोप काढणे भोवले; सहा वर्षांसाठी हकालपट्टी

पक्षाच्या ध्येयधोरणांचे उल्लंघन होत असेल, तर त्याची गय होणार नाही. यापूर्वी देखील असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली आहे. आगामी काळात महायुतीच्या विरुद्ध जो नेता आणि कार्यकर्ता अशा पद्धतीचे बंड पुकारेल, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. पक्षाच्या व्यासपीठावर प्रत्येकाला आपले म्हणणे मांडता येते. पण जाहीरपणे पक्षाच्या विरोधात भाष्य करू नये, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेड्डी यांच्यासह सगळ्यांनाच खडसावून सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!