Mahayuti : राज्यसभेतील 12 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यातील 2 जागा महाराष्ट्रातील आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी यातील एक जागा आम्हाला देण्याचं महायुतीच्या बैठकीत ठरलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपने या एका जागेसाठी आम्हाला शब्द दिला आहे, असा दावा त्यांनी केला होता. विशेष म्हणजे भाजपने अजितदादांना दिलेला शब्द पाळला आहे. राज्यसभेतील पीयुष गोयल यांची जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात येणार आहे. या जागेचा 4 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे, हे विशेष.
दुसऱ्या जागेचा पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. ही जागा भाजपचे धैर्यशील पाटील यांना मिळणार आहे. त्यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. पीयूष गोयल व उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. पीयूष गोयल यांची रिक्त होणारी जागा आपल्याला मिळावी, अशी राष्ट्रवादीने भाजपकडे मागणी केली होती. तसे आश्वासन लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी देण्यात आले होते. दादांना भाजपाने दिलेले शब्द पूर्ण करण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
राज्यसभेतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जागा वाटप करताना सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपने त्यांच्याकडे घेतला होता. त्याचवेळी पीयूष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या जागेवर नितीन पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो, असे अजित पवारांनी वाई येथे जाहीर केले होते. नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असून वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत.
Chandrapur Constituency : जोरगेवारांचा चेंडू शिंदे, फडणवीस यांच्या कोर्टात
कोण आहेत नितीन पाटील?
नितीन पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये त्यांचा प्रभाव आहे. नितीन पाटील हे सातारा डीसीसी बँकेचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. अनेक व्यासपीठांवर ते अजित पवारांसोबतही दिसत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त ट्रॅक्टर चालवताना दिसत होते.