महाराष्ट्र

Tushar Bhartiya : कारवाईपूर्वीच पक्षातून दिला होता राजीनामा

Badnera Constituency : तुषार भारतीय म्हणाले माझ्या मनात कमळ

Assembly Election : बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात अर्ज भरल्यानंतर आपण राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपने केलेल्या कारवाईबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. आपल्या मनामध्ये कमळ आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळाल्यानंतर पुन्हा भाजप आपल्याला पक्षात घेईल, असा ठाम विश्वास तुषार भारतीय यांनी व्यक्त केला. पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या राज्यभरातील 40 जणांविरुद्ध भाजपने कारवाई केली आहे. यामध्ये अमरावती शहरातून तुषार भारतीय यांचाही समावेश आहे.

भाजपने कारवाई केल्यानंतर भारतीय यांनी ‘द लोकहित’शी बोलताना या संदर्भात भाष्य केलं. ती म्हणाली की, वास्तविकपणे रवी राणा यांनी महायुतीशी धोकेबाजी केली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीने रवी राणा यांना पाठिंबा दिला आहे. परंतु त्यानंतरही राणा यांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात स्वतःच्या पक्षाची उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे खरंतर महायुतीने रवी राणा यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांचे अस्तित्व काय आहे हे दिसले.

कोणाशीच पटत नाही

अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रवी राणा आणि नवनीत राणा यांचे कोणाशीच पटत नाही. त्यांच्या तक्रारीवरून आपल्या विरुद्ध कारवाई झाली का, याबद्दल आपण बोलू शकत नाही. परंतु रवी राणा यांच्या तक्रारीवरून पक्षाने असे काही केले असेल असं वाटत नसल्याचे तुषार भारतीय म्हणाले. आपण भाजपचे विरोधात कोणतेही काम केलेले नाही. आपण महायुतीसोबत धोका करणाऱ्या रवी राणा यांच्या विरोधात. आतापर्यंत त्यांना महायुतीने हाकलून द्यायला हवे होते. आजही वेळ गेलेली नाही राजकारणात कोणाचीही न होणारे रवी राणा सध्या सत्ता असल्याने भाजपजवळ गोंडा घोळत आहेत. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्याकडे पळायचे असे त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध व्हावे, असा आवाहन देखील तुषार भारतीय यांनी केलं.

Nana Patole : फडणवीसांनी लाल रंगाचा अपमान केला

बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ही नाराजी उघडपणे दिसून आली. राणा यांच्यामुळेच अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मोठे नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीतही राणा यांच्यामुळेच बडनेरासह सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राणा जिथे जातील तिथे नुकसानच होईल, अशी टीका तुषार भारतीय यांनी केली. आपण भाजपशी एकनिष्ठच आहोत. मात्र जो कोणी भाजपला किंवा महायुतीला नुकसान पोहोचवण्याचं काम करत असेल, अशा व्यक्तीला रोखणं देखील आपलं कर्तव्य आहे अशी भूमिका तुषार भारतीय यांनी व्यक्त केली. भाजपकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भातील माहिती अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही असेही त्यांनी सांगितलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!