Congress news : भाजप पराभवाच्या छायेत असल्यामुळे बूथ कॅप्चरिंगचे प्रमाण देशात वाढलेले आहे. भाजप नेत्याच्य मुलाने गुजरातमध्ये सरकार असल्यामुळे बूथ कॅप्चरिंग करून स्वत: इन्स्टावर टाकले. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजप करीत आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घ्यावी,अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात आरोपी
उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात बाँब स्फोटातील आरोपी असल्याचा आरोप भाजपने केला आहे त्यावर पटोले म्हणाले,भाजपला आरोप करण्याचा अधिकार नाही. उलट भाजपलाच प्रश्न आहे, मध्यप्रदेशात सरोज नावाची व्यक्ती टेररिस्ट फंड गोळा करून देत होती. त्याला भाजपमध्ये घेतल्याचे अनेक फोटो आहे. त्यामुळे भाजपला या पद्धतीचे आरोप करण्याचा अधिकार नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. जो कोणी मशाल घेऊन फिरणारा असेल आणि आतंकी असेल त्यावर कारवाई करावी.
10 हजार कोटींचा भ्रष्टाचार
महाराष्ट्रात 108 नंबरची ॲम्बुलन्स रुग्णांसाठी चालवली जाते. याची सुरुवात काँग्रेसने केली होती. त्याला एक्सटेन्शन देण्यासाठी दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने केलेला आहे. सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळू नये आणि ते तडफडत मरावे. ब्लॅक लिस्ट कंपन्यांना सरकारने काम दिले आहे असा आरोप पटोले यांनी केला.
Maharashtra Lok Sabha Election : राज्यात 35 पेक्षा जास्त जागा जिंकू
या माध्यमातून गैरप्रकार
रस्ते त्यासाठी वेगळे महामंडळ तयार करण्यात आले. या महामंडळाचे प्रमुख ब्रिजेश दीक्षितला केले. त्याला भ्रष्टाचार कसा करायचा याचा मोठा अनुभव आहे. नवीन मंडळ तयार केले. यात 25000 कोटीवरचे एस्टिमेट तयार करून जास्तीत जास्त मलिदा कसा खाता येईल यासाठीचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. निवडणुकीच्या तोंडावर उद्या त्या टेंडरची प्रक्रिया कशी होऊ शकतो. कोणाला त्याचा फायदा देऊन आर्थिक मलिदा खाण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार करत आहे. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करून कोर्टात जाऊ असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
देशातील वातावरण राहुल गांधींच्या नेतृत्वात गॅरेंटी, वॉरंटीच्या बाजूने आहे. भाजप विरोधात प्रचंड चीड लोकांमध्ये आहे. बदलाचे वारे देशभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. आज जगात भारत हा युवकांचा देश म्हणून नावलौकिक आहे. त्यांना बेरोजगार करण्याचे पाप नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने केले. त्यामुळे युवकांना न्याय देण्यास प्राथमिकता असणार आहे. अग्नि योजना बंद करून रेगुलर मिल्ट्रीची भरती करून देशातील तरुण आणि तरुणींना लढण्याचा आणि संधी देण्याचे काम काँग्रेस करणार आहे. पेपर लीक होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेला कायद्याचे रूपांतर आमचे सरकार आल्यावर करू असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला.