महाराष्ट्र

Maharashtra BJP : विदर्भातील बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

Assembly Election : अकोट पासून गडचिरोलीपर्यंत 13 जणांचा समावेश

Strict Action : विधानसभा निवडणुकीच्या काळात बंडखोरी करणाऱ्या राज्यभरातील 40 नेत्यांविरुद्ध भाजपने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत विदर्भातील 13 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अकोटपासून गडचिरोलीपर्यंत अनेकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही नेत्यांनी भाजपमधून बाहेरचा रस्ता धरला आहे. काहींनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची नावे कारवाईच्या यादीत समाविष्ट नाहीत.

निवडणुकीपूर्वी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची समजूत घालण्यात येईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बंडखोरांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे भाजपच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यात विरोधाभास दिसून आला. बंडखोरी शांत करण्याचे प्रयत्न संपल्यानंतर आता भाजपने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार अनेक मतदारसंघात नेत्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

विदर्भातही फटका

भाजपमधील बंडखोरीचा फटका विदर्भातील नेत्यांनाही बसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी स्वतःहून भाजपच्या पदांचा राजीनामा दिला आहे. याच मतदारसंघातून डॉ. अशोक ओळंबे हे उमेदवारी न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पार्टीत गेले आहेत. अकोटमधून भाजपने गजानन महाले यांना निलंबित केली आहे. वाशिम जिल्ह्यातून नागेश घोपे यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तुषार भारतीय यांच्यावर कारवाई झाली आहे.

तुषार भारतीय हे रवी राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. महायुतीमधून रवी राणा यांची लाथ मारून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. भारतीय यांची तक्रार यांच्याकडून करण्यात आली. राणा यांच्या तक्रारीची दखल घेत भाजपने भारतीय यांना पक्षातून काढले आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतरही जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Amravati : कागदपत्र नसलेले सहा कोटींचे सोनेचांदी जप्त 

अचलपूर मधून प्रमोद गडरेल, साकोलीतून सोमदत्त करंजेकर, आमगाव मधून शंकर मडावी, उमरखेडमधून भाविक भगत, नटवरलाल अंतवल यांच्याविरुद्ध भाजपने कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रिजभूषण पाझारे यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ब्रह्मपुरीमधून वसंत वरजुरकर, राजू गायकवाड, एतेशाम अली यांच्या विरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाकडून अद्यापही काही लोकांची समजूत काढण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र निवडणुकीच्या काळात भाजपच्या विरोधात काम करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!