महाराष्ट्र

Akola BJP : काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात भाजपला लीड

Risod Vidhan Sabha : अनंतराव देशमुखांचे वर्चस्व वाढलं

Congress News : अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड- मालेगाव मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत गड म्हणून ओळखला जातो. मात्र याच मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंना मोठं मताधिक्य मिळाले आहे. ही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी जमेची बाजू असल्याचं बोललं जातं आहे. मताधिक्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अनंतराव देशमुख यांचीही ताकद वाढली आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. या मतदार संघाचे राजकारणात नेहमी वजन राहीलं आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक आमदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये दोन्ही विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. असे असताना देखील त्यालाही न जुमानता काँग्रेसने हा गड कायम राखला होता.

भाजप निघाली पुढे

लोकसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघात भाजपला लीड मिळाला आहे. या मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रेंना 80 हजार 232 मतदान झालं. काँग्रेसचे अभय पाटील यांना 72 हजार 150 इतकं मतदान झालं. त्यामुळे दोघांच्या मतदानात भाजपच्या धोत्रेंनी आघाडी घेतली. धोत्रे यांना पाटील यांच्या विरोधात 8 हजार 82 मतदान अधिक झालं आहे. त्यामुळे काँग्रेसचा मतदारसंघ असूनही भाजपला मताधिक्य मिळाले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे भाजप काँग्रेसला धोबीपछाड देऊ शकते.

एकंदरीतच रिसोड मतदारसंघात भाजपला काँग्रेसपेक्षा मतदान वाढले आहे. अनंतराव देशमुख यांचीही ताकद वाढली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत अनंतराव देशमुख यांचे सुपुत्र नकुल देशमुख विरुद्ध अमित झनक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. रिसोड मतदारसंघातील कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक परिवार हे तसे दोन्ही परिवार कॉंग्रेसचे कट्टर. मात्र या दोन्ही परिवाराचे वैर जगजाहीर आहे. हे वैर 2009 मधील निवडणुकीत मतदारांना पाहायला मिळाले.

देशमुख यांची बंडखोरी

कॉंग्रेसशी बंडखोरी करत अनंतराव देशमुख यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 2014 मधील निवडणुकीतसुद्धा कॉंग्रेसच्या देशमुख घराण्याने भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला. कॉंग्रेसला पुन्हा सुरुंग लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना त्यातही अपयशच आले. आता भाजपमध्ये गेलेल्या अनंतराव देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या मताला भगदाड पाडले. या विधानसभा मतदारसंघावर गेली 15 वर्षे पकड ठेवली. तत्कालीन काँग्रेसचे माजी मंत्री तथा गेल्या वर्षीच भाजपमध्ये गेलेले अनंतराव देशमुख यांनी या निवडणुकीत काम केले.

Looting Of Farmer : बोगस बियाणांच्या गुजरात कनेक्शन

देशमुख यांनी केलेले काम खऱ्या अर्थाने फळाला आले. धोत्रे यांना रिसोड मतदारसंघात मिळालेले मताधिक्य मोठे आहे. अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख यांच्यासाठी यामुळे विधानसभेचा मार्ग सुकर झाला आहे. मालेगाव-रिसोडचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या आतापर्यंतच्या प्रभुत्वाला त्यामुळे आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!