महाराष्ट्र

Nana Patole : गोमांस विक्रीतून भाजपने मिळविला पैसा

Congress on BJP : उद्धव ठाकरेंनी घोषणा करून योग्य नाही केले !

Nagpur News : देशात लोकशाहीचा प्रश्न मूळ आहे. काँग्रेसचे खाते गोठविण्यात ओल आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे. विरोधी पक्षांकडे पैसाच राहू नये हा धंदा भाजपने चालविला आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने निवडणुकीसाठी पैसे घेतला आहे. भाजपनेही आयकरही भरलेला नाही. अशात त्यांचे खाते का गोठवले नाही. आयकर हा नवा कार्यकर्ता भाजपमध्ये आला आहे. हिंमत असेल तर आयकर विभागाने भाजपचे खाते गोठवावे, असे थेट आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले.

कोण येणार, कोण जाणार, यापेक्षा लोकशाही महत्वाची आहे. ती टिकवण्यासाठी काँग्रेस काम करत आहे. भाजपच्या नेत्यांना धडकी भरेल, असे प्लान आम्ही तयार करतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. राज्यात भ्रष्टाचार करणारे त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसले आहेत, असा घणाघात पटोलेंनी केला. नागपुरात शुक्रवारी (ता. 22) नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते.

पटोले म्हणाले. चंद्रपूरबाबत लवकरच स्पष्टता होणार आहे. दोन नावे चर्चेत आहेत. यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावांवर विचार सुरू आहे. शिवानी वडेट्टीवार की विजय वडेट्टीवार याबाबत ‘हायकमांड’ निर्णय घेणार आहे. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे.

पक्षाचा आदेश आला तर..

काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढवेल. नाही तर जो उमेदवार काँग्रेसचा असेल त्याला पूर्ण शक्तीने विजयी करून घेऊ, असे पटोले म्हणाले. रामटेक मतदारसंघात उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तेथे उमदेवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे.

वंचितसोबत वाटाघाटी सुरू

‘वंचित’सोबत चर्चा सुरू आहे. त्यावर काय निर्णय झाला, हे येत्या दोन दिवसांत कळेल. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप सर्व उमेदवारांची घोषणा केलेली नाही. महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरू असल्याने घोषणा करण्यास विलंब झाला असल्याचे सांगण्यात येते. पण उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करू, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!