Congress On BJP : लोकसभा निवडणुक पार पडली आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. रविवारी 9 जून रोजी पंतप्रधान मोदींसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. निवडणुकीचा उत्सव पार पडला तरीही राजकारण्यांमध्ये शब्दयुद्ध आणि खडाजंगी सुरूच आहे. यावरून काँग्रेसचे खासदार दिपेंद्रसिंह हुद्दा यांनी वक्तव्य केले आहे.
काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी आपल्या ताज्या वक्तव्यात पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याबाबत भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले आहे. दीपेंद्र हुड्डा यांनी शपथविधी सोहळ्यात भारताच्या तिन्ही जल, थल आणि हवाई सैन्यांचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. सीडीएससह तिनही सेनांचे प्रमुख खूप मागे बसले होते. अनेक उद्योगपती आणि अभिनेत्यांना त्यांच्या पुढे बसवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे, याचा तीव्र निषेध करतो. असे दिपेंद्रसिह हुड्डा म्हणाले.
जय जवान-जय किसान’चा देश..
दिपेंद्रसिंह हुड्डा पुढे म्हणाले की, देशाच्या लष्कराचा आदर हाच आहे का? यावर सरकारने उत्तर द्यावे. हा ‘जय जवान-जय किसान’चा देश आहे. हा देश आम्ही ‘जय धनवान’ होऊ देणार नाही. यावर सरकारने उत्तर द्यावे आणि यासाठी कोणावर कारवाई होणार हे सांगावे.
Supriya Shrinate : आंबेडकर, ओवैसींमुळे महाविकास आघाडीला बसला फटका
काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या या प्रश्नांवर आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून किंवा लष्कराच्या अधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता या आरोपांना कोण आणि काय उत्तर देते, हे पाहावे लागणार आहे.