Nagpur : महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नाही. केवळ स्टंटबाजीच्या नादात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे घृणीत कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. या कृत्यावर माफी मागून पळवाट काढणा-या आव्हाडावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. संविधान चौकात आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.
महाड येथे आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फायदा. त्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविताना गुरूवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आव्हाडांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
नागपुरातील संविधान चौकामधील आंदोलनामध्ये ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आव्हाडांच्या कृत्यावर शरद पवारांनी स्वत: स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. आव्हाडांचे कृत्य हे घृणीत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राच्या चेह-यावर लागलेले काळे कापड आहे.असे कृत्य करून आंबेडकरी समुदायाचा अपमान करणा-या व्यक्तीला जो पर्यंतअटक होत नाही, कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू, असा इशाराही त्यांनी दिला.
जे हृदयात असतात, जे डोक्यात असतात ते फाडले जात नाहीत, असे सांगतानाच ॲड. मेश्राम यांनी आव्हाडांच्या जे पोटात होते ते ओठात आले आणि ओठातले कृतीत आले. त्यामुळे बाबासाहेबांचे पोस्टर फाडण्याचे लांछनास्पद कृत्य या छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांनी केले आहे. जे अत्यंत चुकीचे आहे. त्या विरोधात आमचा आक्रोश आहे, अशा परखड शब्दांत निषेध नोंदविला.
Hit And Run : ‘त्या’ घटनेतील आरोपीला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे देशातील 140 कोटी जनतेचे दैवत आहेत. या देशातील संविधानाची निर्मिती करणा-या दैवताचा जर अपमान होत असेल तर अशा विरोधींनी माफी मागून चालणार नाही. हे आंदोलन माफी मागण्यासाठी नाही तर त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी आहे.असे ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलनात जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव कोहळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, सुभाष पारधी, अजय बोढारे , चरणसिंह ठाकुर, नरेश मोटघरे, मनोज चवरे, शंकर मेश्राम, सुधीर जांभुळकर, इंद्रजित वासनिक, मोहिनी रामटेके, उषा पॅलेट, नुतन शेंदुरनिकार, महेंद्र प्रधान, नेताजी गजभिये, स्वप्निल भालेराव, सुनील तुर्कल, दिलीप गोईकर, नितीन वाघमारे, प्रीति बहादुरे, अमर लोहखरे, दीपक मघाडे, संदीप पाटील, रामकृष्ण भीलकर, सचिन चंदनखेडे, किशोर बेहडे, बंटी पैसाडेली, आकाश सातपुते, निखिल गोटे, ज्योती रामटेके, विशाल वानखेडे, विजय ढोके, रंजीत गौरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.