महाराष्ट्र

Assembly Elections : भाजपचं ठरलं! आता घटक पक्षांना टेन्शन?

BJP Politics : महायुतीचे काय होणार? कोअर कमिटीची बैठक

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. पण, महायुतीतील मधील पक्ष विधानसभेच्या कामाला लागली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची दुसरी बैठक गुरुवारी (दि.१८) मुंबईत घेतली. या बैठकीला केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यात आल्यानंतर भाजपने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे घटक पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. 

भाजपच्या नेत्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत सुरू आहे. कालच्या बैठकीला केंद्रातील दोन महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत 170 ते 180 जागा लढवण्याचा सूर आळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याला वरिष्ठ नेत्यांची अनुकूलता असल्याचंही कळतंय. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात जागा मागितल्या. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाचे टेन्शन वाढणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. भाजप किती जागांवर लढू शकतो आणि विजयी होऊ शकतो याची चर्चा करण्यात आली. तसेच लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो आणि लोकसभा निवडणुकीत कमी झालेल्या मतांची कसर कशी भरून काढता येईल यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

महायुतीत भाजपने 170 ते 180 जागा लढवल्या पाहिजेत असा आग्रह धरला. जेवढ्या जागा जास्त लढू, तेवढा अधिक फायदा होईल, असा सूर या बैठकीत आळवण्यात आला. यामध्ये घटक पक्ष प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर जागा वाटपाचा फार्मूला ठरविण्यात येईल असे या बैठकीत ठरले. भाजप कार्यसमितीची या नंतरची बैठक पुण्यात होणार आहे. त्यात राज्यातील नेत्यांच्या या मागणीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीला हव्यात 80 जागा

अजितदादा गटाने यापूर्वीच 80 जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वात आधी 80 जागांची मागणी केली. त्यानंतर अजितदादांनीही मागणी केली आहे. शिंदे गटाएवढेच आमदार आमच्याकडेही आहेत. त्यामुळे समान वाटा मिळाला पाहिजे, असं अजितदादा गटाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही विधानसभेच्या 80-85 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!