महाराष्ट्र

Nagpur BJP : देवाभाऊंना शपथ घेताना पाहण्यासाठी नागपूरमधून कार्यकर्ते रवाना 

Bunty Kukde : नागपूर, विदर्भासह पूर्ण महाराष्ट्राचा विकास होणार 

Maharashtra New CM : भाजपमधील नवनिर्वाचित उमेदवारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होणार आहे. या ऐतिहासिक शपथविधीसाठी नागपूरमधून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे नेते बंटी कुकडे यांनी ही माहिती दिली. नागपुरात प्रसार माध्यमांची संवाद सत्तांना त्यांनी ‘देवाभाऊ’ यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. 

बंटी कुकडे म्हणाले की, नागपूर मधून अनेक कार्यकर्त्यांना रीतसर निमंत्रण आले आहे. सुमारे 366 पदाधिकारी व कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद सर्वांना होत आहे. भाजपला महाराष्ट्रात मिळालेले यश हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आहे. विदर्भामधील त्यातल्या त्यात नागपुरातील व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे.

राज्यभरातून कार्यकर्ते रवाना 

नागपूर जिल्ह्यातील माजी खासदार, आमदार यांच्यासह महानगरपालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आले आहे. पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी तसेच विधानसभा मतदारसंघातील प्रमुखांनाही मुंबईला बोलावण्यात आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जीव तोडून मेहनत केली. त्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातून भाजपचे काही पदाधिकारी मुंबईत पोहोचले आहेत. आणखी काही नेते व पदाधिकारी शपथविधी सोहळ्यापर्यंत मुंबई पोहोचतील असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याने नागपूर शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आपापल्या सोयीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेताना बघण्याची इच्छा आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर नागपुरातील कार्यकर्ते दिसतील, असेही बंटी कुकडे यांनी स्पष्ट केले. एकट्या नागपूर शहरातून सुमारे 4 हजार भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Mahayuti : आई‘शप्पथ’! मुंबईला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल!

स्वखर्चाने प्रवास 

नागपुरातील सर्व भाजप कार्यकर्ते मुंबईकडे टप्प्याटप्प्याने रवाना होत आहेत. यापैकी अनेकांनी मुंबई भाजपा कार्यालयाला फोनवरून ते येत असल्याची माहिती दिली आहे. नागपूर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मोठी क्रेझ आहे. विदर्भामध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे केवळ नागपूरतूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांचे चाहते मुंबईत येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर शहर भाजप कार्यालयामध्ये सुमारे 10 हजार कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याच्या प्रवेश पाससाठी पाठपुरावा करीत आहे. या सगळ्यांची व्यवस्था होणे शक्य नसले तरी, जास्तीत जास्त प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत जातील, असेही बंटी कुकडे यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!