महाराष्ट्र

Nagpur Constituency : माजी महापौरांना व्हायचय आमदार!

Assembly Election : नागपूर पश्चिममध्ये भाजपचे इच्छुक; विकास ठाकरेंना टक्कर देणार?

BJP : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे असले तरीही हा मतदारसंघ कायम भाजपचाच गड राहिला आहे. अगदी सुरुवातीच्या चार निवडणुका सोडल्या तर भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत विकास ठाकरेंनी भाजपची घोडदौड रोखली. पण आता पश्चिम नागपूरमध्ये ठाकरेंना आव्हान देण्यासाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये दोन माजी महापौरांचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे आव्हान उभे केले. पहिलीच निवडणूक असतानाही त्यांनी चांगला सामना केला. 5 लाखांहून अधिक मते घेतली. त्यामुळे पश्चिम नागपूरची विधानसभा लढणे त्यांच्यासाठी अधिक सोपे झाले आहे. या मतदारसंघात त्यांना दमदार मते पडली. त्यामुळे विधानसभेत त्यांना फारशी मेहनत करावी लागणार नाही, असे चित्र आहे.

अशात भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरीही इच्छुकांमध्ये दोन माजी महापौरांचा समावेश आहे. एक म्हणजे दयाशंकर तिवारी आणि दुसऱ्या माया इवनाते. यांच्याशिवाय धरमपेठ बँकेच्या निलिमा बावणे, नरेश बरडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र दयाशंकर तिवारी आणि माया इवनाते यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते.

डिसेंबर 2020 मध्ये संदीप जोशी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दयाशंकर तिवारी यांनी पदभार स्वीकारला. हा कोरोनाचा काळ होता. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेने उत्तम काम केल्याची पावतीही मिळाली आहे. पण त्यांची कारकिर्द 2022 पर्यंतच होती. त्यानतंर प्रशासकीय राजवट महापालिकेत आली. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला मुक्काम पश्चिम नागपूरमध्ये हलवल्याचे समजते. या भागात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना विजयाची आशा आहे.

Political Campaigning : ना टेन्शन, ना खर्च; निवडणुकीत ‘सोशल प्रेझेंन्स’ला अर्थ 

दुसरीकडे 2007 ते 2009 या कालावधीत 

महानगरपालिकेचे नेतृत्व करण्याची संधी भाजपने माया इवनाते यांना दिली होती. गोंड आदिवासी समूदायातील नेत्याला संधी दिल्यामुळे चांगले संकेत गेले होते. इवनाते यांना त्यावेळी राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यानंतर त्यांनी स्वतःचा जम बसवला. आज पश्चिम नागपुरात त्यांचेही नाव चांगले आहे. याशिवाय नरेश बरडे भाजपचा ओबीसी चेहरा आहे. पश्चिम नागपुरात हे कार्ड किती चालेल, याबाबत साशंकता आहे. धमरपेठ बँकेच्या संचालक निलिमा बावणे यापूर्वी नगरसेवक होत्या. पण विकास ठाकरेंना टक्कर देतील, असे वाटत नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!