महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वाढदिवसाला पुरविला दिव्यांग विद्यार्थ्यांचा हट्ट

Birthday Celebration : साधेपणाने स्वीकारल्या शुभेच्छा

Special Day : भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 22) अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रायगड (Raigrah)जिल्ह्यातील पेण येथील (Pen) दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह केला. त्याला तत्काळ प्रतिसाद देत फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचा हट्टही पुरविला. पेणच्या सुहित जीवन ट्रस्ट येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला.

देवेंद्र फडणवीस हे दिव्यांगाबाबत सहकार्याची भूमिका घेतात. पेणच्या सुहित जीवन संस्थेलाही त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचाच आहे, असा आग्रह या विद्यार्थ्यांनी केला. त्यानुसार फडणवीस यांना माहिती देण्यात आली. फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना हट्ट पुरवित त्यांच्याशी संवाद साधला. शुभेच्छांबद्दल दिव्यांगांचे त्यांनी आभार मानले. विद्यार्थी व फडणवीस यांनी एकमेकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

देशभरातील नेत्यांकडून शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांना देशभरातील नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती जयदीप धनगड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हरदीपसिंग पुरी, पीयूष गोयल, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, अभिनेते प्रसाद ओक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, नारायण राणे यांचाही शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये समावेश होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान, रामदास आठवले, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव, डॉ. जितेंद्र सिंग यांनी फडणवीस यांचे अभिष्टचिंतन केले. जी. किशन रेड्डी, किरण रिजिजू, अन्नपूर्णा देवी, ज्युएल ओराम, प्रल्हाद जोशी, डॉ. वीरेंद्र कुमार, सर्वानंद सोनोवाल, जितनराम मांझी, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, हेमंत बिस्वा शर्मा, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फडणवीस यांना शुभकामना दिल्या.

Parliament Session : विकसित भारत निर्माण करण्यासाठी पायाभरणी

बॅनरबाजी नाहीच

फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बॅनरबाजी किंवा शक्तीप्रदर्शन न करण्याची सूचना केली होती. त्यानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन केले. अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. काही ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. शालेय साहित्याचे वितरण करूनही फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. त्याचे अर्ज भरण्यासाठीही काही ठिकाणी विशेष शिबिर घेण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!