महाराष्ट्र

Nitin Gadkari : ‘ईयरएन्ड’ला करणार नितीन गडकरी दिल्या शब्दाची ‘पूर्ती’

Samriddhi Mahamarg : भंडारा- गोंदिया गडचिरोली समृध्दी महामार्गाचे काम डिसेंबरमध्ये..

Samrudhi Mahamarg : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोली पर्यंत करण्याचा निर्णय झाल्यानंतर शासनानेही मान्यता दिली होती. आता भंडारा- गोंदिया- गडचिरोली महामार्गाची निविदा प्रक्रिया एमएसआरडीसीने काढली आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर येत्या डिसेंबर पासून महामार्गाच्या कामास सुरुवात होणार आहे.त्यामुळे डिसेंबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडक़री यांच्या शब्दाची वचन पूर्ति होणार आहे.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन प्रकल्पांसाठी एकूण 46 तांत्रिक निविदा सादर झाल्या आहेत. यामध्ये नागपूर- चंद्रपूरसाठी 22, भंडारा-गडचिरोलीसाठी 4, तर नागपूर- गोंदियासाठी 20 अशा एकूण 46 निविदा सादर झाल्या आहेत. येत्या दहा-बारा दिवसात आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा अंतिम करून चालू वर्षातच तिन्ही महामार्गांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हे तिन्ही महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास विदर्भातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

Kunal Raut : कुणाल राऊतांच्या विरोधात असंतोष उफाळला, कारवाई होणार ?

11 टप्प्यात मागवल्या निविदा

समृद्धी महामार्गाचा नागपूर चंद्रपूर,भंडारा गडचिरोली आणि नागपूर गोंदिया असा विस्तार करण्यात येणार आहे. या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी एमएसआरडीसीने 11 टप्प्यात निविदा मागविल्या होत्या. शुक्रवारी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या. तीन महामार्गाच्या कामासाठी 11 टप्यात 46 निविदा सादर झाल्या आहेत. 194 किमीच्या नागपूर चंद्रपूर महामार्गासाठी सहा टप्प्यात 22 निविदा सादर झाल्या आहेत. तर 142 किमीच्या भंडारा- गडचिरोली महामार्गासाठी एका टप्प्यात 4, तर 162 किमीच्या नागपूर – गोंदिया महामार्गासाठी चार टप्प्यात 20 निविदा सादर झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द लोकहित’ ला दिली. त्यामुळे लवकरच महामार्गाची समृद्धी भंडारा- गोंदियाकर व गडचिरोलीकर अनुभवणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!