Ganga Aarti : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर नेते आता आपापल्या पुढील योजनांकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. यातच भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे युवा नेते आमदार डॉ. परिणय फुके निवडणुकीनंतर गंगा आरतीत सहभागी झाले. मनःशांती आणि अध्यात्मिक समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. फुके यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ते गंगा आरतीत सहभागी झालेले दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी जनतेला एक भावनिक संदेश दिला आहे. गंगा ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. निवडणुकीच्या धावपळीनंतर येथे आल्यावर मानसिक शांतता लाभली आहे, असा संदेश त्यांनी आपल्या पोस्टमधून नागरीकांना दिला आहे.
नुकत्याच्य झालेल्या निवडणुकीत डॉ. परिणय फुके यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. त्यांचा प्रचार व्यापक आणि ठोस होता. निकाल त्यांच्या अपेक्षेनुसार लागला . यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले होते की, “लोकशाहीमध्ये जय किंवा पराजय, याला तितकेसे महत्त्व नसते. लोकसेवा हीच माझी प्राथमिकता आहे.
संदेश..
गंगा आरतीतून त्यांनी जनतेला एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या पोस्टमधील संदेश विशेष लक्षवेधी ठरला. आपल्या संस्कृतीत गंगेचा प्रवाह जसा निरंतर आहे, तसाच आपल्या सेवा कार्याचा प्रवाह असावा, असे डॉ. फुके म्हणाले. डॉ. फुके यांची ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीनंतर नेते विश्रांतीसाठी विविध ठिकाणी जात असतात. मात्र, डॉ. फुके वाराणसीसारख्या धार्मिक ठिकाणी जाऊन गंगा आरतीत सहभागी झाले. याला त्यांचा अध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन जोडलेला आहे, असे जाणकारांचे मत आहे.
जनतेतील प्रतिक्रिया..
डॉ. फुके यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या समर्थकांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या अध्यात्मिक दृष्टीकोनाचे स्वागत केले आहे. अनेकांनी या पोस्टखाली शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. परिणय फुके यांचा गंगा आरतीतील सहभाग हा फक्त निवडणुकीनंतरची विश्रांती नाही. तर एका नेत्याचा आपली ऊर्जा पुनर्संचित करण्याचा प्रयत्न आहे, असे मानले जात आहे. राजकीय क्षेत्रात त्यांची पुढील वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.