Chandrapur constituency : लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. पण त्याहून महत्वाचं असतं ते राष्ट्रीय कर्तव्य. हेच लक्षात ठेवत वणी विधानसभेतील लाठी गावातील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला.
आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, म्हातारे कोतारे, मध्यमवयीन नागरिक , मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दित आहेत. त्यातच वणी विधानसभेतील लाठी गावातील एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरूण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या.
Lok Sabha Election मेंढे,पडोळे यांचे नशीब होणार ईव्हीएम बंद !
राहुल खिरटकर असे त्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं राहुलने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत. चंद्रपूर लोकसभेत माहविकास आघाडीच्या प्रतिभाताई धानोरकर विरुद्ध महायुतीचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे.