महाराष्ट्र

Yavatmal Constituency : याला म्हणतात ‘कॉन्फिडन्स’, निकालापूर्वीच विजयाचे बॅनर

Shiv Sena : यवतमाळ -वाशिममध्ये संजय देशमुख यांचे झाले अभिनंदन

Lok Sabha polling : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. सर्वांनाच या निकालाची उत्सुकता आहे. परंतु पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील, असे बॅनर लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर झळकले आहेत. 

पुसद शहराच्या अनेक भागातही हे पोस्टर झळकले आहेत. या बॅनरवर विजय निश्चित, अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही असे नमूद आहे. समोर महाविकास आघाडी असा आशय आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी पूर्वीच संजय देशमुख यांचा विजय जल्लोष सुरू झाला आहे. महायुतीच्या गोटात मात्र सध्या शांतता आहे.

व्यापक प्रचार 

लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संजय देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात करून प्रचाराचे नारळ फोडले होते. मित्र पक्षांच्या नेत्यांशी अगदी व्यवस्थित समन्वय साधत संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. मोदी सरकारच्या फसव्या घोषणा यामुळे शेतकरी आणि खास करून युवा वर्ग कसा फसविल्या गेला, हे मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी झाल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे शिंदे गटाच्या भावना गवळी यांचे नाराजी नाट्य सुरू होते. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले. अगदी शेवटच्या क्षणी राजश्री पाटील यांची उमेदवारी घोषित झाली.

Fishermen Detention : बंदी मच्छीमारांसाठी मुनगंटीवारांची मोदींना हाक

उमेदवारी वरून संघ परिवार नाराज झालेला दिसला. त्यामुळे परिवार कुठेही प्रचारात दिसल्याचे आढळले नाही. दुसरीकडे भावना गवळी समर्थकांमध्ये पसरलेली नाराजी यामुळे निवडणुकीत नेमके काय होईल काही सांगता येत नाही. अशात कार्यकर्त्यांना संजय देशमुख यांच्या विजयाबद्दल 100 टक्के खात्री आहे. उलट महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाबद्दल कमालीची उदासीनता आहे. याशिवाय यवतमाळच्या सट्टा बाजाराने संजय देशमुख यांना कौल दिला आहे.

असे झळकले बॅनर

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर काही फोटो आहेत. नगर पालिका माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचाही फोटो आहे. आता बॅनर वरून सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. ‘आमच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावले आहेत. या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांचा तळागाळातील मतदारांशी डायरेक्ट कनेक्ट होता. उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या साठी योजना आणल्या. शेतकऱ्यांसंबंधी आणि युवकांसाठी त्यांची तळमळ आहे. अशात मतदारांनी दिलेला जनादेश स्पष्टच होता. धनशक्तीला मतदारांनी नाकारले हे यावरून स्पष्ट होते. यामुळेच कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावले आहे’, असे संजय देशमुख यांचे म्हणणे आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!