महाराष्ट्र

Balasaheb Mangulkar : बाळासाहेब यवतमाळकरांना देणार ‘अमृत’

Yavatmal News : राळेगावचा पोलिस शिपाई अविनाश ढोणे करतो यवतमाळात वसुली

यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी निवडून आल्यावर पहिलेच अधिवेशन गाजवले. यवतमाळकरांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित केले. यवतमाळातील गुन्हेगारी, त्याला जोडून असलेली पोलिसांची हप्तेखोरी यांसह रखडलेल्या अमृत योजनेचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या अमृत योजनेचे पाणी यवतमाळकरांना देणारच, असा निर्धार त्यांनी केलेला आहे. 

यवतमाळ शहरात जुगार, मटका यांसह इतर अनेक अवैध धंदे फोफावले आहेत. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यांत अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरित त्रस्त झालेले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी आता आमदार बाळासाहेब मांगुळकर सरसावले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करावी, शहराला 24 बाय 7 पाणी पुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या 35 ते 40 वर्षांच्या राजकीय किरकिर्दित अनेकांना ‘पाणी’ पाजणारे बाळासाहेब यांनी आता यवतमाळकरांना पूर्ण वेळ पाणी पुरवठा करण्यासाठी पावले उचलली आहेत.

ओचित्याच्या मुद्द्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले, ‘शहरात जुगार, मटका यांसह अवैद धंदे व गुन्हेगारी फोफावली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करावी, शहराला पूर्ण वेळ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी 302 कोटी रुपयांची अमृत योजना मंजूर करण्यात आली. तीन वर्ष योजना पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु 9 वर्ष उलटून गेले तरी ही योजना पूर्ण झाली नाही. या कामात प्रचंड अनियमितता आहे. शहरातील लोकांना ‘अमृत’चे पाणी अद्याप मिळालेले नाही. यासाठी कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे, असे मांगुळकर म्हणाले.

यवतमाळ जिल्यातील शेतकऱ्यांना 2023-24 च्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. पीक विमा कंपन्यांच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. 300 कोटी रुपयांच्या पीक विम्याच्या वितरणाचे आदेश आहेत. परंतु कृषी विभागाकडे अद्याप त्याची यादी नाही, ही शोकांतिका आहे. पिक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यानी सभागृहाला केली.

Pravin Darekar : फडणवीस, गडकरी करत आहेत राज्याचे चित्र बदलण्याचे काम !

पोलिसांची अवैध वसुली..

यवतमाळ शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिस कर्मचारी अवैध वसुली करतात, ही गंभीर बाब आमदार मांगुळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावचा पोलिस शिपाई अविनाश ढोणे याला यवतमाळमध्ये केवळ आणि केवळ वसुलीसाठी आणण्यात आले आहे. ढोणे अॅडीशनल एसपी, वाहतूक शाखा आणि अवधूतवाडी पोलिस स्टेशनची वसुली करत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळातील गुन्हेगारी संपवण्याचा शब्द मतदारांना दिलेला आहे. आणि हा शब्द ते पूर्ण करणार, याची चुणूक त्यांनी पहिल्याच अधिवेशनात दाखवून दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!