Akola constituency : अकोला लोकसभा मतदार संघातील 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1 हजार 632 मतदार अशा एकूण 2 हजार 358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ आजपासून झाला. रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावला.
अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरूवात रिसोड तालुक्यातून झाली. गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
गृह मतदानाच्या तारखा निश्चित
गृह मतदानासाठी दिव्यांग व वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
Lok Sabha Election : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे घरून मतदान 21 पासून
रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 13 व 15 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 18 एप्रिल असा आहे. अकोट विधानसभा मतदार संघ, तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास 22 एप्रिल असा आहे. बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास 19 एप्रिल असा आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे.
सर्व संबंधीत दिव्यांग व 85 वर्षापुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.