महाराष्ट्र

Human Trafficking : बदलापूर शाळेचे संचालक पोलिसांच्या ताब्यात!

Badlapur : चाईल्ड पोर्नोग्राफीचे आहेत आरोप; न्यायालयात हजर करणार

ठाण्यातील बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतलं आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात तुषार आपटे आणि उदय कोतवाल सहआरोपी आहेत. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर दोघेही फरार झाले होते. पण या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. बदलापूरच्या शाळेत 12 आणि 13 ऑगस्टला दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरच्या नागरिकांनी घटनेच्या विरोधात रोष व्यक्त करत रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती. या प्रकरणातील सहआरोपी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे फरार होते. अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप होत होता. अटक टाळण्यासाठी शाळेच संस्थापक अध्यक्ष व सचिवांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mumbai High Court : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबाबत संभ्रम

दीड महिन्यानंतर आरोपींना जेरबंद

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींवरुन सरकारवर निशाणा साधला होता. अखेर दीड महिन्यांनी या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींचा तपास करणाऱ्या एसआयटी टीमने ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही आरोपी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव आहेत.

अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज

शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर घटनेनंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. या दोन्ही आरोपींचा शोध एसआयटी, ठाणे क्राईम आणि भिवंडी गुन्हे शाखेचं पथक घेत होतं. पण ते सापडत नव्हते. दुसरीकडे या दोन्ही आरोपींच्या बाजूने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांनी उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयानेदेखील त्यांची मागणी केली नाही. या दरम्यान, त्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. त्यांची आता चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!