महाराष्ट्र

Bacchu Kadu : सरकारमध्ये असल्यावरही योजनेवर आक्षेप 

Monsoon Session : सरकारी अट मागे घेण्याची मागणी

Budget : रोखठोक भूमिकेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रसिद्ध आहेत. सत्तेत राहूनही सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारच्या एका योजनेवर आक्षेप घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली. यापैकी एका योजनेवर बोलताना बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. पाच एकरपेक्षा कमी जमीन, ही अट योग्य नाही. ही अटच चुकीची आहे. पाच एकराची जमीन असलेला शेतकरी आत्महत्या करीत नाही का ? असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यातील काही योजनेवर सत्तेत सामील असलेले आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. 29 जून रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्थिक मदत नाही 

बच्चू कडू म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना एक अट घातली आहे. ज्याची जमीन पाच एकर आहे, त्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. ही अटच चुकीची आहे. पाच एकर जमीन असलेला शेतकरी आत्महत्या करीत नाही का ? असा प्रश्न करीत कडू यांनी शेतकऱ्यांची वर्गवारी सरकारने करायला हवी होती.

Bhandara News : एक रुपयाच्या विम्याला पाचशेचा खर्च

इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी, न भरणारा शेतकरी अशी वर्गवारी करायला हवी होती. हे देखील पाहायला हवे, पाच एकरहून कमी जमीन असणाऱ्यांना मदत केली जाणार आहे. जर जमीन एक ते दोन एकर आहे. परंतू ही शेतजमीन जर नागपूर, पुणे शहरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असेल तर त्याला मदतीची गरज नाही. त्यामुळे पाच एकरहून कमी जमीन ही अट दूर करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

वेळेवर निधी मिळत नसल्याचा आरोप

बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगांना तीन महिने झाले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाही. केंद्र सरकारने एक वर्षापासून 200 रुपये दिलेले नाही. श्रावणबाळ योजनेचे आपण 1 हजार 300 रुपये देतो. परंतू वेळेवर पैसे मिळत नाहीत असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!