महाराष्ट्र

Assembly Election : स्वराज्य पक्ष, प्रहार संघटनेचे मनोमिलन 

Bacchu Kadu : विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत

Maharashtra Politics : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष, आणि बच्चू कडू यांची प्रहार संघटना एकत्र लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संभाजीराजे संभाजीराजे 9 ऑगस्टला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Lok Sabha) आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

निवडणुकीपूर्वीची सर्वांत महत्त्वाच्या घडामोडी नुकतीच घडली आहे. यात संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आणि बच्चू कडू यांची प्रहार संघटना निवधानसभा निवडणुकीत एकत्र येऊ शकतात, असे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोल्हापूर गादीचे वंशज तथा राजर्षी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू आहे. आता ही संघटना प्रत्यक्षात राजकारणात सक्रिय होणार आहे.

हातमिळवणीची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले ‘डॅशिग’ नेते आमदार बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत राजकीय मैत्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेपुढे आणखी एका युतीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

Gondia : ना खांब, ना मीटर तरीही शेतकऱ्याला 15 हजाराचे बील

स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना यांच्या विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करू शकतात. त्यादृष्टीनेच संभाजीराजे

ऑगस्ट महिन्यात यावर भाष्य करतील असे सांगण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी एकत्र निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. बच्चू कडू अनेकदा शेतकरी, दिव्यांग, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झालेले बघायला मिळाले आहे. संभाजीराजे हे कोल्हापूर गादीचे वंशज असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिवप्रेमींच्या मनात वेगळा आदर आहे. दोन्ही नेते निवडणुकीत एकत्र आल्यास युतीचा नवा पर्याय मतदारांना मिळणार आहे. विशेषत: शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी आणि शिवप्रेमींना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. या युतीचा दोन्ही नेत्यांना मोठज्ञ फायदा होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. 

प्रतिमेचा फायदा

बच्च कडू आणि संभाजी राजे छत्रपती यांची वेगळी प्रतिमा आहे. त्याचा त्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्ष विधानसभेच्या किती जागांवर निवडणूक लढवतात? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अलीकडेच बच्चू कडू यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक झळकले होते. सध्या बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या पक्षाचे संख्याबळ ते मुख्यमंत्री व्हावे, एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. बच्चू कडू महायुतीच्या सरकारमध्ये चांगलेच नाराज आहे. सरकारवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपशी उघड पंगा घेतला. त्याचा फटका भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना बसला. काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडणुकीत विजयी झालेत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही बच्चू कडू यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

IPS Transfer : नागपूर सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांची बदली

विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीसाठी आव्हान उभे करतील की काय? असे सर्वांना वाटतच होते. अशात छत्रपती संभाजी राजे यांच्यासोबत युती करून कडू निवडणूक मैदानात उतरल्यास त्याचा महायुतीला फटका बसू शकतो.

संघटना होणार पक्ष

छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आहे. या संघटनेचे रुपांतर आता पक्षात होणार आहे. या पक्षाची नोंदणी देखील करण्यात आली आहे. संभाजीराजे याबाबत घोषणा करणार आहेत. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचीदेखील संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे दोन्ही नेते सोबत येतील असेच चित्र सध्या आहे. संभाजी राजे छत्रपती यांना मानणारा मोठा वर्ग पश्चिम महाराष्ट्रात आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाची पश्चिम विदर्भात पकड आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्यास महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!