महाराष्ट्र

Bacchu Kadu : तुपकरांनंतर आता कडूंची आघाडी

Assembly Election : मराठा, शेतकरी नेत्यांना घातली साद

Beginning Of New Front : राज्यात लवरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी युती-आघाडीच्या बोलणीला वेग आला आहे. महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष आहे. त्यापैकी तीन महाविकास आघाडी करून निवडणूक लढणार आहेत. उर्वरित सहा महायुतीमध्ये आहेत. अशात मनोज जरांगे पाटील यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. अशात प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नव्या आघाडीसाठी हालचाल सुरू केली आहे.

बच्चू कडू यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांना साद घातली आहे. याशिवाय रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांनाही त्यांनी सोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय मतदारांना उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडू यांची मनधरणी कदाचित महायुतीमधील नेत्यांना करावी लागू शकते. यासाठी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पुढाकार घ्यावा लागतो की काय, असे दिसत आहे. सध्या बच्चू कडू सरकारवर विशेषत: भाजपवर नाराज आहेत.

नवा पर्याय मिळणार

बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यास त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. त्यामुळे महायुतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशात बच्चू कडू यांना खुश करण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावेच लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडू ऑगस्ट महिन्यात एल्गार करणार आहेत. क्रांतीदिनीच बच्चू कडू राज्याच्या राजकारणाचा चेहरा बदलणारा निर्णय घेऊ शकतात असे सांगितले जात आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांनी जरांगे पाटील, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांना साद घातली आहे. यासंदर्भात अद्याप शेट्टी, जरांगे किंवा तुपकर यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा पाडाव झाला. महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू यांनीही उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली. सत्तांतर झाले तेव्हापासून बच्चू कडू यांना मंत्रिपदाची आशा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही. नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग व मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतरही बच्चू कडू समाधानी नव्हते. अमरावतीच्या (Amravati) लोकसभा निवडणुकीत त्यांची नाराजी आणखी वाढली. बच्चू कडू यांच्यासह अनेकांना नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध होता. परंतु हा विरोध असतानाही भाजपने राणा यांना पक्षातही घेतले व उमेदवारीही दिली. तेव्हापासून बच्चू कडूंची नाराजी टोकाला गेल्याचे दिसत आहे. त्यातून त्यांनी तिसऱ्या आघाडीची हालचाल सुरू केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!