Buldhana Lady Hospital : बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात भुलतज्ञ डॉक्टरने प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय पेशाला कलंक लावणाऱ्या अविनाश सोळंकी नामक डॉक्टरला एका आदेशान्वय निलंबित केले आहे.
आठवडा उलटूनही कारवाई होत नसल्याने एआयएमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला. 5 जून पर्यंत डॉक्टर विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल न झाल्यास बुलढाण्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
Prakash Ambedkar : पणजोबांसारखीच तुषार गांधींची जातीय भावना..
ही धक्कादायक घटना 11 मे रोजी रात्री बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली होती. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक सदर डॉक्टरला पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत एआयएमआयएम पार्टीने या प्रकरणात उडी घेतली. शुक्रवारी पक्षाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी भूलतज्ज्ञ डॉ.अविनाश सोळंकी याला निलंबित केले. या गंभीर प्रकाराची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशाखा समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.