महाराष्ट्र

Nagpur : कोहळेंची जीभ घसरली; पश्चिम नागपुरातील ‘रावण’ कोण?

Sudhakar Kohale : जाहीर सभेतील भाषणानंतर चर्चांना उधाण

Assembly Election : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र असे करत असताना पातळी सोडूनदेखील अनेकदा समोरच्यावर टीका केली जाते. पश्चिम नागपुरातील भाजपचे सरप्राईज उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासोबतदेखील असाच प्रकार झाला. त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोर भाषण करताना त्यांची जीभ घसरली व चक्क पश्चिम नागपुरातील रावण उखाडून फेकू असे त्यांनी वक्तव्य केले.

आता ते तेथील आमदारांना उद्देशून रावण म्हणाले की त्यांचा रोख आणखी कुणाकडे होता, असा सवाल उपस्थित होत आहे. पश्चिम नागपुरात भाजपकडून अनेक उमेदवार इच्छुक होते. मात्र अखेरच्या क्षणी सुधाकर कोहळे यांची वर्णी लागली. नाराजांना मनविण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता.

दक्षिण नागपुरातील कोहळे यांनी पश्चिममध्ये घर भाड्याने घेत प्रचाराला सुरुवात केली. सकाळपासून रात्रीपर्यंत कोहळे प्रचारात व्यस्त राहत असल्याचे चित्र आहे. त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून साथदेखील मिळते आहे. कोहळे हे स्वत: एकेकाळी शिक्षक होते व सांभाळून बोलणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. मात्र असे असले तरी गडकरींसमोर बोलताना त्यांची जीभ घसरलीच.

पश्चिम नागपुरातील आमदार व काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी कोहळे यांची थेट लढत आहे. भाषणादरम्यान त्यांनी पश्चिम नागपुरातील राक्षस मतदारसंघातून उखाडून फेकायचा आहे. ही लढाई सोपी नाही. कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र केली तर सर्वजण राक्षसाला पश्चिम नागपुरातून बाहेर काढू शकतो, असे वक्तव्य केले. यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले असून सोशल माध्यमांवर त्यावरून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

MNS : काँग्रेसचे बल्लापपुरातील उमेदवार संतोषसिंह रावत अडचणीत !

भाजप कार्यकर्तेही नाराज

सुधाकर कोहळे दक्षिणमधधून पश्चिममध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना भाजप कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवावे लागणार आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत कार्यकर्त्यांसोबत बोलतानाही त्यांचा जिभेवर ताबा नाही, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. त्यांच्या वागण्यामुळे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहे. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!