महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जे खोटं असतं, त्याचं वय छोटं असतं !

Akola Politics : आपल्या जागा कमी आल्या, पण जनाधार कमी झाला नाही.

Legislative Assembly Election : अकोल्यात जिंकण्याची पपंपरा कायम ठेवली. अकोला भाजपचंच आहे, हे तुम्ही दाखवून दिलं. संजय धोत्रेंसारखे चांगले कार्यकर्ते आपल्याला मिळाले. अनुप धोत्रेही तसंच काम करतील, याचा विश्वास आहे. विदर्भाच्या जडणघडणीत भाऊसाहेब फुंडकरांनी मोलाचे योगदान दिले आहे. स्व. लालाजींचीही आठवण आज येते. कारण ते एक वेगळे व्यक्तिमत्व होतं. आता आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 11) केले.

अकोला येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेश महामंत्री रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, युवा खासदार अनुप धोत्रे प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, किशोर पाटील, रणजीत पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, बळीराम शिरस्कार नारायण गव्हाणकर, शाम बढे, श्रीकृष्ण शर्मा, अर्चना मसने आदी होते. 

विधानसभा निवडणूक आपलीच 

यावेळी फडणवीस म्हणाले, लोकसभेची निवडणूक आपण महाविकास आघाडीच्या तिन पक्षांसोबत नव्हे तर चौथ्या पक्षासोबतही लढलो. तो चौथा पक्ष म्हणजे फेक नरेटीव्ह. हा फेक नरेटीव्ह महाराष्ट्रात आणि देशात तयार करण्यात आला. त्यासाठी एक मोठी एको सिस्टीम दोन-तीन वर्षांपासून तयार करण्यात येत होती. याला काही तथाकथीत पत्रकार आणि काही सोशल मिडिया इन्फ्लुंर्सनी साथ दिली. भाजप 400 पार आली तर आरक्षण समाप्त करणार, असाही एक नरेटीव्ह पसरवण्यात आला.

डॉ. आंबेडकरांनी 50 वर्षांकरीताच आरक्षण दिले होते. ज्यावेळी मर्यादा संपली, तेव्हा तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ते पुढे कायम केले. आरक्षण जे चालत आलं, ते अटलजींच्या त्या निर्णयामुळेच. भाजपचं सरकार आल्यावर आरक्षण काढून टाकणार, हे नरेटीव्ह अगदी खालपर्यंत पसरवण्यात आले. 30 टक्के आदिवासी आणि दलितांवर त्याचा परिणाम झाला. मोठे नरेटीव्ह मुस्लीम समाजात चालवण्यात आले. ध्रुवीकरण करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला.

Nasik Medical : नाशिक मेडिकल हब म्हणून विकसीत होणार,छगन भुजबळांना विश्वास !

आधार कमी झाला नाही

आपल्या जागा कमी आल्या. पण आपला जनाधार कमी झाला नाही. महाराष्ट्रात मविआला 43.9 महायुतीला 43.6 ट्क्के मते आहे. 0.3 टक्के मते आपल्याला कमी मिळाली. म्हणजे त्यांच्यापेक्षा फक्ते 2२ लाख मते कमी मिळाली. पण त्यामुळे त्यांच्या 31 आणि 17 जागा आल्या. भाजपच्या 12 जागा 3 टक्क्यांपेक्षा कमी मताधिक्याने पडल्या. मोठे उदाहरण धुळ्यात 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात 1,90,000 लीड मिळाला. त्यांना एका मतदारसंघात 1,94,000 मते मिळाली. फेक नरेटीवमुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली.

जे खोटं असतं, त्याचं वय छोटं असतं. दलित, आदिवासी समाजाच्याही लक्षात येतं आहे की त्यांची दिशाभूल झाली. ०.३ टक्क्यांनी आपण जरी हारलो असलो, तरी गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील वातावरण बदलवले. ‘लाडकी बहीण’मुळे चार-पाच टक्क्यांनी आपण पुढे गेलो. त्याचा त्रास मविआला होतो आहे. योजना बंद पाडण्यासाठी पहिले ते कोर्टात गेले मग हायकोर्टात गेले. हायकोर्टाने पीटीशन फेटाळली. मग म्हणाले योजनेत पैसैच नाही. पुढच्या बजेटपर्यंतचे पैसै ठेवल्याचा दाखला आपण दिला. मग त्यांची तोंडं बंद पडली. मग म्हणाले 1500 रुपयांत काय होते. त्याचं महत्व गृहीणींना माहिती आहे. मविआच्या नेत्यांना माहिती नाही, असं फडणवीस म्हणाले. 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!