महाराष्ट्र

Akola BJP : कट्टरवादाला रोखण्यासाठी त्याग केला

Ashok Olambe : नेत्यांनी शब्द न पाळल्यास अर्ज भरणारच

Assembly Election : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये सध्या प्रचंड चढाओढ सुरू आहे. या मतदारसंघातून अनेक दावेदार आहेत. अशात डॉ. अशोक ओळंबे हे बंडखोरी करू शकतात, असं त्यांच्या विरोधकांकडून बोललं जात आहे. यावर आता डॉ. ओळंबे यांनीच भाष्य केलं आहे. डॉ. ओळंबे म्हणाले की, अकोल्यात भाजपची सुरुवात झाली तेव्हापासून आपण पक्षात कार्यरत आहोत. आपला राजकीय जन्मही भापजमध्ये झाला आणि आयुष्याचा अखेरचा श्वासही भाजपमध्येच होईल. 

तत्कालीन खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्यासोबत केलेलं काम पक्षानं पाहिलं आहे. गेल्या निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार होतो. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे त्यावेळी उमेदवार होते. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षातील काहींनी अर्ज दाखल केला होता. आपण अर्ज दाखल करण्याच्या तयारी असल्याचं कळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा डॉ. ओळंबे यांनी केला.

योग्य वेळ केव्हा

फडणवीस यांनी संपर्क साधल्यानंतर आपण अकोल्यातील एकूणच परिस्थितीचा विचार केला. 1992-93, 2003 अशा दंगलींचा घटनाक्रम आपल्या डोळ्यापुढं आला. त्यामुळं आपण अर्ज भरला आणि मतांचं विभाजन झालं तर अकोल्यात कट्टरवाद फोफावेल असं वाटलं.

या पापाचं भागिदार आपल्याला व्हायचं नव्हत. आपण स्वत: जुने शहर भागात राहातो. अकोल्यात आजपर्यंत ज्या दंगली घडल्या, त्या सगळ्यांचीच सुरुवात जुने शहरातूनच झाली. त्यामुळे आपल्या कृतीनं कट्टरवादाला चालना नको, म्हणून आपण गेल्या निवडणुकीत माघार घेतली.

Assembly Election : दोन जागांसाठी काँग्रेसचे आमदार मुंबईत!

आपण माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘डॉक्टर तुम्ही पक्षाशी प्रामाणिक आहात. योग्य वेळी त्याचा योग्य तो मोबदला पक्ष देईल’, असा शब्द दिला होता. आता गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. त्यामुळे आता योग्य वेळ आली आहे असं वाटतं. जे पक्षात राहून पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात काम करतात, त्यांना आता पक्षानं ओळखावं.

जुने आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना जपावं. पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा आहे. पक्षानं संधी दिली तर आनंदच आहे. पण संधी दिली नाहीच तर अपक्ष उमेदवारीचा पर्याय खुला आहे, असंही डॉ. अशोक ओळंबे यांनी ठामपणे नमूद केले. यंदाच्या निवडणुकीत काहीही झालं तरी माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!