महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून आठवली बहिण लाडकी !

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ, काँग्रेसचा झेंडा विधानसभेवर फडकणार.

Political war : लोकसभेत मतांची कडकी आली म्हणून महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली आहे.आता तुम्हाला दीड हजार देतील मात्र तीन हजारने खिसा कापतील. त्यामुळे भगिनींनो सतर्क रहा, असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मराठवाडा विभागातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, म्हणाले, मराठवाडा आणि काँग्रेसचं भावनिक नातं आहे. मराठवाडामधून तीन मुख्यमंत्री दोन गृहमंत्री काँग्रेसच्या नेतृत्वाने दिले आहेत. मराठवाड्याने 100 टक्के निकाल लोकसभेत दिला. तीन खासदार पहिल्यांदा निवडून दिल्याबद्दल मराठवाड्यातील जनतेचे कौतुक केले पाहिजे.

राहुल गांधी यांची मागणी

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या न्यायाचे हक्काचे आरक्षण मिळणार आहे. लोकसभेत आपले खासदार जोमाने लढत आहेत. त्यामुळे 56 इंच छाती म्हणणाऱ्यांची छाती आता 36 इंच झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सत्तेत बसवले आहे. 70 हजार कोटी खाल्ले आणि सरदार विचारतात बेटा कितना खाया?

Sudhir Mungantiwar : विजय कदम यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची श्रद्धांजली !

या सरकारला घालवण्यासाठी ताकदीने एकत्र या, असे आवाहन करत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. काँग्रेसचा तिरंगा विधानसभेवर फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली आता महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचविण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? गुजरातला गहाण नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

विलासराव देशमुख यांची आठवण

लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी जाग्या करत वडेट्टीवार म्हणाले, साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांची आठवण येते. 2004मध्ये ओबीसींना शिष्यवृत्ती देण्याचे काम साहेबांनी केले होते. सध्या मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात असले तरी दोन्ही समाजांना काँग्रेसने नेहमीच न्याय दिला आहे.

 

लातूर येथे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालना येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!