AAP : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होत नाहीत. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने 26 जून बुधवारी त्यांना सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा दिल्ली उत्पादन शुल्क 2021-22 प्रकरणात सीबीआयने तिहार तुरुंगात त्यांची चौकशी केली. यानंतर त्याच्या अटकेची माहिती मिळाली असून बुधवारी 26 जून रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी जामिनावर बंदी घालण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. आता पक्ष नव्याने याचिका दाखल करणार आहे.
सीबीआयने मंगळवार आणि बुधवारी अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात बराच काळ चौकशी केली होती. यावेळी केजरीवालांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्या संबंधित प्रश्न विचारण्यात आले. सीबीआयने सुरुवातीला या प्रकरणात केस दाखल केली , तेव्हा केजरीवालांना आरोपी ठरवले नव्हते. मात्र नंतर ईडीने केस दाखल करीत अरविंद केजरीवालांना आरोप ठरवलं.
ही हुकूमशाहीच..
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली की, अरविंद केजरीवाल यांना 20 जूनला जामीन मिळणार होता. परंतु ईडीने तातडीने उच्च न्यायालयात जाऊन त्यावर बंदी आणली. दुसऱ्याच दिवशी सीबीआयने त्यांना आरोपी सिद्ध करून 26 जून रोजी अटक केली.
Vidhan Sabha : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का ; पाच समर्थकांचा भाजपात प्रवेश
केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हा कायदा नाही, ही हुकूमशाही आहे , असे सुनीता केजरीवाल म्हणाले.
ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना 25 जून मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून झटका बसला. यावेळी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दिलेला जामीन अवाजवी असल्याचे म्हटले होते.
सीबीआयने 25 जून रोजी रात्री 9 वाजता तिहार येथे जाऊन केजरीवाल यांची दारू धोरणातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी केली होती. यापूर्वी, ईडीने त्यांना 21 मार्च रोजी मद्य धोरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. ते 10 मे ते 2 जून म्हणजेच 21 दिवसांच्या पॅरोलवर होते.
जलमंत्री उपोषणावर..
दिल्ली वर संकट काही कमी होताना दिसत नाही एकीकडे अरविंद केजरीवाल तर दुसरी कडे दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणातून दिल्लीला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी संपुष्टात आले. मंगळवारी पहाटेपासूनच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना उपोषण थांबवावे लागले. त्यांना दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.