Police Recruitment : वाढत असलेल्या बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या 17 हजार पदांसाठी 17 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जामध्ये अभियंते, डॉक्टर, वकील, एमबीए असे उच्चशिक्षित तरुण सहभागी आहेत. त्यामुळे बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे दिसून येते.
राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलिस दलात 17,471 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. पोलिस भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. उच्चशिक्षितानीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
सरकारी नोकरीची क्रेझ की वाढती बेरोजगारी!
नोकरीतील स्थिरता लक्षात घेता तरुणांचा पोलिस कॉन्स्टेबल भरतीत कल दिसतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्यामागे सरकारी नोकऱ्यांची क्रेझ असल्याचे मानले जात आहे. मात्र,ही क्रेझ आहे की राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही कारण आहे.
Lok Sabha Election : राजकीय समीकरण बदलले अन् धनुष्यबाणाच्या जागी कमळ आले
अशी होणार प्रक्रिया!
महाराष्ट्र पोलिस दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध पातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात लेखी चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन पोलिस दलात सहभागी होत येणार आहे.
शासनाची कोट्यवधीची कमाई!
राज्यभरातून 17 लाख 76 हजार अर्ज प्राप्त झाले. पोलिस भरती परीक्षेसाठी अर्ज शुल्क साधारणपणे 1000 रुपये असते.परंतु येथे ते कमी करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 450 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 350 रुपये शुल्क ठेवण्यात आले होते. एकूण अर्जांमधून सरकारला अंदाजे 71.4 कोटी रुपये मिळाले आहेत.