महाराष्ट्र

Bhandara Gondia : भंडारा-गोंदियाकरांचे मतदान सुरक्षित ठेवण्यासाठी 75 जवानांचा वाँच !

Lok Sabha 2024 : स्ट्राँगरूम भोवती जवानांची छावणी..

19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतदार झाले. प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरून जमा केलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स, भंडारा शहराजवळ असलेल्या पलाडी येथील स्ट्राँगरूम मध्ये ठेवल्या आहेत.

या इमारतीला सील लावण्यात आले आहे. ते आता एकदम मतमोजणीच्या वेळी उघडले जाणार आहे.

75 सशस्त्र जवानांसह सीसीटीव्हीचा वॉच येथे 24 तास आहे. त्यामुळे भंडारा- गोंदिया येथील नागरिकांचे मतदान सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये 67.04 टक्के मतदान झाले.

या मतदारसंघात 18 लाख 27 हजार 188 मतदार असल्याची नोंद आहे. दोन्ही जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून फक्त 12 लाख 24 हज़ार 956 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.

इवीएम सुरक्षित 

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व ईव्हीएम जमा करण्यात आल्या. त्या सुरक्षितपणे येथे पोहोचविण्यात आल्या होत्या. उमेदवार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक विनय सिंग हे उपस्थिती असताना स्ट्रॉग रूमला सील लावण्यात आले होते. हे करताना निवडणूक कागदपत्रांची ईसीआयच्या निकषानुसार उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष छाननी करण्यात आली.

Political Leaders : राजकीय पक्ष, पुढाऱ्यांचे लक्ष मतमोजणीकडे !

दरम्यान स्टाँगरूम परिसरात आणि आत एकूण 50 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यावरून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा वॉच ठेवून आहे. उमेदवार या सीसीटीव्हीवरून येथील सुरक्षा पाहू शकतात.

या स्ट्राँग रूमच्या बंदोबस्तासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. पहिल्या स्तरात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 29 जवान कर्तव्यावर आहेत.

तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 25 आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयातील 22 अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरुवातीला सीआरपीएफ त्यानंतर एसआरपीएफ व त्यानंतर जिल्हा पोलिस असे हे त्रिस्तर सुरक्षा कडे आहे.

या स्ट्रॉग रूमला दिवसभरात एकदा निवडणूक अधिकारी भेट देतात. तेथील सुरक्षेची आणि अन्य व्यवस्थेची पाहणी केली. नोंद नियमितपणे घेऊन वरिष्ठांना अहवाल दिला. असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ‘द लोकहित’ला माहिती देताना सांगितले. त्यामुळे भंडारा-गोंदिया येथील नागरिकांचे मतदान सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!