प्रशासन

ACB : पुरातत्व विभागाची महिला अधिकारी एसबीच्या जाळ्यात

Absconded : तर पुरुष अधिकारी फरार

Nashik News : कंपनी चालू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. ते देण्यासाठी पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांना दीड लाखाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी पकडले.

या प्रकरणात आळे यांनी पर्यटन व सांस्कृतिक संचालानालयाचे संचालक तेजस गर्गे यांना लाच स्वीकारल्या बाबत सांगून त्यांच्या हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ असे कळविले. लाचेची व त्यांच्या हिश्याची रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवल्याने त्यांच्यावर इंदिरानगर पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

घरी साडेतीन लाखाची रोकड

कारवाईनंतर तपास यंत्रणेने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक तेजस गर्गे यांचा शोध सुरू केला. परंतु, ते घरी सापडले नाहीत. पुण्याला गेल्याचे कळल्यानंतर पुण्यातही पथकाने शोध घेतला. परंतु, ते गायब झाले होते. मुंबईतील कफ परेड भागात गर्गे यांचे घर आहे. ते गोठविण्याची कारवाई करण्यात आली. तर सहायक संचालक आरती आळे यांच्या राणेनगर येथील घराच्या झडतीत साडेतीन लाखाची रोकड सापडली आहे.

Maharashtra Lok Sabha Election : वंचितची सतीश पवार विरुद्ध पोलिसात तक्रार

सापळा रचून ताब्यात घेण्यात आले

तक्रारदाराला कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यांनी सरकार वाड्यातील प्राचीन वास्तूत कार्यरत सहाय्यक संचालक आरती आळे यांच्याकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या बदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारली असताना त्यांना अटक करण्यात आली

तेजस गर्गे फरार

तेजस गर्गेंवर कारवाई झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. पोलिसांचे एक पथक आणि मुंबई लाचलूचपत विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. बुधवारी त्यांचा पथकाकडून शोध घेण्यात आला पण हाती काही लागले नव्हते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!