महाराष्ट्र

Vidhan Parishad : विधान परिषदेमध्ये येणार ‘राम’राज्य

Maharashtra Legislature : सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल 

Winter Assembly Session : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदासाठी निवडणूक होत आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान सभापती निवडणूक होणार आहे. या पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रा. राम शिंदे यांना या पदासाठी संधी देण्यात आली आहे. शिंदे यांनी बुधवारी (18 डिसेंबर) निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ‘द लोकहित’ने राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षाने आपल्याला मोठी संधी दिली आहे. जी जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे, ती प्रभावीपणे पार पडण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. विधान परिषदेचे सभापती पद देखील जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे या पदावरून काम करताना आपण नि:पक्षपणे आणि घटनात्मक पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडू.

नीलमताईंचे काय? 

विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती सध्या नीलम गोऱ्हे या आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते असलेल्या नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचे सभापती केले जाईल असे वाटत होते. मात्र विधानसभेचे अध्यक्षपदानंतर भाजपने विधान परिषदेसाठी देखील बाजी मारली आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी पिठासिन प्रमुख भारतीय जनता पार्टीचा राहणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वानाच होती. सुरुवातीपासूनच राम शिंदे यांचे नाव चर्चेमध्ये होते. या नावावर एकमत झाल्यानंतर राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे यांच्याबाबत चर्चेला पेव फुटले.

Winter Assembly Session : बस्स बेटा.. मंडेला घरी भेटू

पुन्हा नाराज? 

महायुतीला बहुमत मिळाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी ओढाताण सुरू होती. अखेर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत. तीन मंत्र्यांच्या शपथविधीनंतर नागपूर येथे कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र अद्यापही खातेवाटप झालेले नाही. शिवसेना आजही गृह आणि महसूल विभागाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गृह विभाग देवेंद्र फडणवीस हे नेहमीप्रमाणे स्वतःकडेच ठेवणार आहेत. त्यामुळे अद्यापही शिवसेनेतील नाराजी दूर झाली नाही का? अशी चर्चा राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाही ऐकायला मिळाली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!