महाराष्ट्र

Hingoli News : मराठा आरक्षणासाठी, आणखी एका तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation : मृत व्यक्तीच्या खिशात सापडली चिठ्ठी

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीच्या नंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान सरकार आरक्षणावर सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नसल्याने जीवन संपवित आहे. चिठ्ठी लिहून हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता. वसमत) येथील गजानन पुरभाजी इंगोले एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येची ही सोळावी घटना आहे.

‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे यांनी दिला. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील घटनेने खळबळ उडाली आहे.

RSS संघाच्या कार्यक्रमात अंबानींचे जावई आणि नाना पाटेकरांचा मुलगा

मृताच्या खिशात चिठ्ठी

मराठा समाजाला आरक्षणच्या मागणीसाठी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने राहत्या घरी गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळेस गळाफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याकरीता मी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मृत तरुणाच्या खिशात सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कुरुंदा येथील गजानन पुरभाजी इंगोले यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी सरकार करीत नाही. त्यामुळे मी जीवन संपवित असल्याचे सापडलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत नोंद झाली नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर हिंगोली जिल्हयातील ही सोळावी आत्महत्या आहे. दरम्यान, मृत तरुणाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!