महाराष्ट्र

Chandrapur : भोई समाजाचा पाठींबा मुनगंटीवारांनाच; काँग्रेसला साथ देण्याचा प्रश्नच नाही !

Sudhir Mungantiwar : संतोषसिंग रावत यांना पाठिंबा दिल्याची बातमी धादांत खोटी 

Chndrapur : आमच्या समाजातील काही लोकांनी आमिषाला बळी पडून काँग्रेस – महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंग रावत यांना पाठींबा दिला. तशी बातमीही माध्यमांमध्ये प्रकाशित झाली. पण ही बातमी पूर्णतः खोटी आहे. ज्यांनी पाठींबा दिल्याची घोषणा केली. त्यांचा भोई समाज संघटनेशी दुरान्वयेही संबंध नाही. भोई समाजाचे अधिकृत संघटन भाजप – महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा जाहीर करत आहे, अशी घोषणा भोई समाज संघटनेचे सचिव दिनेश गोंदे यांनी शनिवारी (1६ नोव्हेंबर) केली. 

भोई समाजाचे नेते दिनेश गोंदे म्हणाले की, चंद्रलाल मेश्राम, यशवंत दिघोरे आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी स्वतःला भोई समाजाचे नेते सांगत काँग्रेसच्या संतोषसिंग रावत यांना पाठींबा दिल्याची घोषणा केली. तशी बातमीही माध्यमांमध्ये प्रकाशित झाली. पण त्यांनी घोषीत केलेला पाठिंबा आणि ती बातमी पूर्णतः खोटी आहे. भोई समाजाचा या पाठींब्याशी कोणताही संबंध नाही. भोई समाजाचे अधिकृत संघटन पूर्णतः वेगळे आहे. सदर बातमी प्रकाशित झाल्यानंतर दिनेश गोंदे यांनी ही माहिती दिली.

भोई समाजासाठी विकास

दिनेश गोंदे म्हणाले आजवर कधी नव्हे ती कामे सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात भोई समाजासाठी झाली. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन आमचा विकास केला. मत्स्य व्यवसाय खातं काय असतं, हे त्यांनी तमाम महाराष्ट्राला दाखवून दिलं. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री असताना मुनगंटीवार यांनी भोई समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. त्यांनी भोई समाजासाठी महामंडळ स्थापन केले. यासाठी महाराष्ट्रातील तमाम भोई समाज त्यांचा ऋणी आहे. कारण आजवर कुठल्याही सरकारमध्ये आमच्यासाठी जी कामे झाली नाहीत, ती सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar : निवडणूक असू देत की सण, मुनगंटीवार शेतकऱ्यांसोबत ‘हर दम, हर कदम’ !

राज्यात मत्स्य व्यवसाय खातं असतं, हेसुद्धा आमच्या भोई बांधवांना माहिती नव्हतं. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ते माहिती पडलं. त्यांनी भोई समाजासाठी आजवर खूप काही केलं. भविष्यात ते पुन्हा मंत्री होतील. त्यांच्याकडे खातं कोणतही येवो. पण ते आम्हाला अंतर देणार नाही, हा विश्वास आम्हाला आहे, असेही दिनेश गोंदे म्हणाले. काही लोकांनी खोडसाळपणाने बातमी दिली. त्याचा आम्ही निषेध करतो आणि तमाम भोई समाज सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत आहे, असे समाजाचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने सांगतो, असेही दिनेश गोंदे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!