महाराष्ट्र

Assembly Election : देशमुख बॅकफुटवर जाताच सतीश शिंदेंची एन्ट्री! 

Anil Deshmukh : सलील देशमुख यांना समर्थन; दादांच्या गटातून काकांच्या गटात

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणुकीतून एक पाऊल मागे घेत मुलाला एबी फॉर्म सोपवला. अनिल देशमुख बॅकफुटवर जाताच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सतीश शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले. त्यांनी सलील देशमुख यांना समर्थनही जाहीर केले. कालपर्यंत महायुतीत असलेले शिंदे उद्यापासून महायुतीच्या विरोधात प्रचार करणार आहेत.

 

सतीश शिंदे राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी कामही केले. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी यु टर्न घेऊन शरद पवारांच्या गटात परत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसाठी हा विदर्भात मोठा धक्का मानला हात आहे. आता सतीश शिंदे यांनी सलील देशमुख यांना समर्थन दिले आहे. ते काटोलमध्ये त्यांच्यासाठी प्रचारात उतरतील.

उपयोग नाही

अजित पवार गटाकडे नागपूर जिल्ह्यातील एकही जागा नाही. अशात ना उमेदवारीची शक्यता ना अपक्ष लढून उपयोग, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय महायुतीत राहून भाजपच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करणे एवढेच त्यांच्या हातात होते. त्यापेक्षा शरद पवार गटात गेल्यास किमान पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करता येणार होता. कारण नागपूर जिल्ह्यातील काटोल, हिंगणा, नागपूर पूर्व या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) उमेदवार लढणार आहे.

Nagpur constituency : मुळक काय करतील? हिंगण्याचीही दारं बंद!

अचानक कसे घडले?

सतीश शिंदे आणि अनिल देशमुख यांच्यात कमालीचे मतभेद आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी अचानक शरद पवार गटात येणे आणि अनिल देशमुख यांच्या मुलाला समर्थन देणे, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. पण, नेहमीप्रमाणे इथेही शरद पवारांनीच मध्यस्थी केली. त्यांनी देशमुख व शिंदे यांना बोलावून घेतले. दोघांशी चर्चा केली. मतभेद दूर करून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. काटोलमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शिंदेंचा फायदा होईल, याची जाणीव त्यांनी अनिल देशमुख यांना करून दिली, असे कळते. त्यानंतर शिंदे यांनी शरद पवार गटात येऊन सलील देशमुख यांना समर्थन जाहीर केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!