महाराष्ट्र

Anil Deshmukh : ‘माझ्या अर्जात चुका काढण्यासाठी दिल्लीतून वकील आणला’

Assembly Election : अनिल देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप; ‘यांच्या बापाला घाबरत नाही’

BJP vs congress : भाजप सरकार माझ्या मागे लागले आहे. पण यांच्या बापाला मी घाबरत नाही. मी उमेदवारी अर्ज भरला असता तर त्यात तांत्रिक चुका काढण्यात आल्या असत्या. त्या चुका काढण्यासाठी या लोकांनी दिल्लीतून वकील बोलावून ठेवला. ते गडबड करण्याच्या पूर्ण तयारीत होते, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी रश्मी बर्वे प्रकरणाचा दाखला दिला. ‘रश्मी बर्वे प्रकरणात तेच झाले. कोर्टाचा निकाल निवडणुकीनंतर आला. दोषी अधिकाऱ्यांना फक्त 1 लाखाचा दंड झाला,’ असंही ते म्हणाले. ईडी, सीबीआयला घाबरलो नाही तर हे कोण लागले? चांदीवाल आयोगाने माझ्यावरील सगळे आरोप खोटे ठरवले. कुठलेही पुरावे नसल्याचे सांगितले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

म्हणून सलीलने फॉर्म भरला

तुरुंगात माझ्याविरुद्ध रचलेल्या कटावर पुस्तक लिहिले आहे. माझ्यावर खोटे आरोप लावून फसवण्यात आले. या पुस्तकात 14 महिन्यांचा संपूर्ण लेखा जोखा आहे, असंही देशमुख म्हणाले. ‘मी गृहमंत्री असताना जळगाव एसपींना फोन केला. गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव टाकला, असे आरोप माझ्यावर करण्यात आले. सीबीआय चौकशी लावल्याचाही आरोप केला. ते माझ्या मागेच लागलेले असतात. मी आता उमेदवारी अर्ज भरला असता तर यांच्या कारवाया सुरू झाल्या असत्या. म्हणून सलीलने फॉर्म भरला,’ असा खुलासा देशमुख यांनी केला केला.

शरद पवार मला मंत्री बनवतील

महाविकास आघाडीचे सरकार येताच मला पहिला एमएलसी (विधानपरिषद सदस्य) मधून निवडून आणतील. शरद पवार 100 टक्के मला अमादर बनवतील आणि मंत्रीपद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

2019 ची पुनरावृत्ती

2019 मध्ये अनिल देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना अलाच उशीर झाला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सलील देशमुख यांच्या संदर्भातही तसेच घडले. मंगळवारी सकाळी ते आई-वडील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरतील.

मी 33 हजार मतांनी विजयी होईल

2019 च्या निवडणुकीत अनिल देशमुख 17 हजार मतांनी विजयी झाले होते. मी सुद्धा 33 हजार मतांनी विजयी होईल, असा विश्वास सलील देशमुख यांनी बोलून दाखवला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!