महाराष्ट्र

Anil Deshmukh : परमवीर सिंह, वाझे हेच मनसुख हिरेनचे मारेकरी

Money Laundering : अनिल देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार

NCP Vs BJP : देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे हेच मनसुख हिरेन यांचे मारेकरी आहेत. मनसुख हिरेनची हत्या होणार असल्याची कल्पना फडणवीस यांनाच होती, असा पलटवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केल्यानंतर देशमुख यांनी त्याला उत्तर दिले. फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्यांना कशापद्धतीनं काम करावं लागतं, हे देखील त्यांना ठाऊक नसेल तर त्याला काय म्हणावं असं देशमुख म्हणाले. 

हत्या घडवून आणली

कोणत्याही मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय शासनाला त्या मृतदेहासंदर्भात माहिती देता येत नाही. मनसुख हिरेन यांच्याबाबतही हाच नियम पाळण्यात आला. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना या हत्येसंदर्भात माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली असा आरोप देखील देशमुखांनी केला. परमवीर सिंह आणि सचिन वाझे काय करतात, कुठे जातात हे फडणवीस यांना ठाऊक होतं. अशात फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे दिसत असल्याचंही देशमुख म्हणाले.

नियमांचे पालन

मनसुख हिरेन यांच्याबाबतीत पोलिस आणि गृहविभागाने सर्व नियम पाळले आहेत. मनसुख हिरेनची हत्या झाल्यावर त्याचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटली नाही, तोपर्यंत त्याबाबत माहिती जाहीर करण्यात आली नाही. ओळख पटल्यानंतर नियमाप्रमाणे ओळख जाहीर करण्यात आली असं देशमुख यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांना एवढंही ज्ञान नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं देशमुख म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या हत्येबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न अनिल देशमुख यांना केले. मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren Murder Case) होणार आहे, हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नाही? हे त्यांनी सांगावं, असं आव्हान फडणवीस यांनी दिलं. आपल्याला माहिती आहे की ते याचे उत्तर देणार नाहीत असंही फडणवीस म्हणाले होते. मनसुख हिरेनच्या हत्येबाबत आपण विधिमंडळाच्या सभागृहात शंका व्यक्त केली होती. मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आलं आणि त्यांची हत्या होऊ शकते, असं आपण म्हटलं होतं असं फडणवीस यांनी सांगितलं.

Assembly Election : महाराष्ट्रात मोदी घेणार केवळ आठ सभा 

फडणवीस यांचा प्रश्न 

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावं. यावरचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. मात्र खोटं बोलण्यासाठी विचार करावा लागतो आणि सत्य हे कधी ना कधी समोर येतच असतं, असं फडणवीस म्हणाले. देशमुख यांनी नुकतेच एक ट्विट केलं. जेलमध्ये प्रचंड त्रास झाला, असं त्यात आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये अनिल देशमुख जेलमध्ये गेले. त्यानंतर जवळजवळ 11 महिने ते जेलमध्ये होते. त्यातील आठ महिने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मग जेलमध्ये त्यांच्या सरकारने त्यांना त्रास दिला का? असा प्रश्नही फडणवीस यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!