महाराष्ट्र

Nana Patole : शाहांच्या निमित्ताने भाजपचा राग बाहेर आला

Amit Shah : नाना पटोले यांची टीका; गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी 

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. विरोधकांना तर एक मोठा मुद्दा हाती लागला आहे. या भाषणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेत भाजपवर निशाणा साधला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात देखील शाहांच्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढेवेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे हे पुढे आले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असेही पटोले म्हणाले.

विधिमंडळ परिसरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

Eknath Shinde : याला भेट त्याला भेट, अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट

विरोधी पक्षनेता कोण ठरवणार?

विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे व ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!