महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : बल्लारपूरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध

Ballarpur Constituency : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या समक्ष मुनगंटीवारांची ग्वाही

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यात मी कोणतीही कसर सोडलेली नाही. औद्योगिक विकासामुळं देशभरातील जवळपास सर्वच जातीधर्माचे लोक चंद्रपूर, बल्लापुरात वास्तव्य करतात. बल्लारपूरमध्ये मिनी भारतच वसलेले आहे. चंद्रपूर आणि बल्लारपुरातील तेलुगू बांधवांनी नेहमीच विकासाला साथ दिली आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूरच्या डब्ल्यूसीएल ग्राऊंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा तेलुगू ‘सुपरस्टार’ पवन कल्याण व्यासपीठावर उपस्थित होते. आंध्र प्रदेशाला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तेलुगू भाषिक बांधवांची संख्या मोठी आहे. तेलुगू भाषिकांनी नेहमीच विकासाला निवडले आहे. यंदाच्या निवडणुकीतही तेलुगू समाजानं विकासालाच निवडावं, असं आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केलं.

पवन यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’

तेलुगू समाजाच्या कल्याणासाठी पवन कल्याण हे व्यापकपणे काम करीत आहेत. आंध्र प्रदेशात पवन कल्याण यांनी कमाल करून दाखविली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यात तेलुगू बांधवांची संख्या मोठी आहे. हा समाज प्रचंड मेहनती असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर आणि बल्लापूरमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास व आपल्याला बल्लारपूर मतदारसंघातील जनतेने आमदार केल्यास पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारण्याचा शब्दही मुनगंटीवार यांनी दिला.

चंद्रपुरात अत्याधुनिक दर्जाची सैनिक शाळा सुरू झाली आहे. वन अकादमी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडांगणांचा विकास झाला आहे. बल्लारपूरमध्येही भव्यदिव्य क्रीडांगण होत आहे. मिनी भारत असल्यानं बल्लारपूरचा कायापालट करण्यावर आपला नेहमीच भर राहिला आहे. विकास करताना आपण जात, धर्म, पंथ याचा कधीच विचार केला नाही. बल्लारपूरनं अयोध्येतील श्रीराम मंदिर, संसद भवन, पंतप्रधान कार्यालयाच्या जडणघडणीत योगदान दिल्याचा मुनगंटीवार यांनी अभिमानानं उल्लेख केला.

Sudhir Mungantiwar : निवडणूक असू देत की सण, मुनगंटीवार शेतकऱ्यांसोबत ‘हर दम, हर कदम’ !

आगामी काळात विकास साधायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नसल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टीनं आपण बल्लारपूर आणि चंद्रपूरचा विकास केला आहे. चंद्रपूर, बल्लारपूरचा शैक्षणिक विकास झाला आहे. लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करण्याचं पाऊल उचललं आहे. ही फक्त सुरूवात असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. विकासाचा सुरू झालेला हा प्रवास थांबायला नको. हा प्रवास थांबला तर विकास थांबेल असंही सुधीर मुनगंटीवार उपस्थित जनसमुदायाला म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!