Political War : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडली आहे. अशात महायुतीतील शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यातील वाद विकोपाला जात आहे. एकदा पुन्हा अडसुळ यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक मी हरलो नाही, हरवलो गेलो. असेही आनंदराव अडसूळ म्हणाले.
नवनीत राजांना पराभव निश्चित
नवनीत राणांचा यंदा पराभव होणार हे निश्चित आहे. राणांनी खासदारकीच्या नावाखाली लोकांच्या घरी नव्हे तर स्वतःच्या घरात पोळ्या लाटून नवरा व मुलाला खाऊ घालावे. राणांनी मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात फक्त नाटकबाजी केली आहे. आदिवासी महिलांमध्ये जायचे व तिथे फेर धरायचा. दहीहंडीचा व इतर कार्यक्रम आयोजित करायचे. एखाद्या कार्यक्रमाला काही अभिनेत्यांना बोलवायचे. अशी कामं लोकांना आवडत नाहीत. या सर्व नाटकांची लोकांना प्रचंड चीड आली आहे. यामुळे नवनीत राणा यंदा हरतील, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
शाहांनी दिला ‘राज्यपाल’पदाचा शब्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला राज्यपाल बनवण्याचा शब्द दिला आहे. अमित शाह, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांचे आश्वासन पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. असे आनंदराव अडसूळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
Akola : अहो आश्चर्यच घडले; निकालापूर्वीच अनुप धोत्रे खासदार बनले
मी हरलो नाही, हरवला गेलो
2019 ची लोकसभा निवडणूक मी हरलो नाही, मला हरविले गेले. सध्या मी या प्रकरणात कुणाचेही नाव घेणार नाही. परंतु, भविष्यात योग्यवेळी नक्कीच मी ते उघडकीस आणेन. या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांचा पराभव निश्चित आहे. कारण, गत 5 वर्षांत त्यांनी कोणतेही काम केले नाही. मी यंदा लोकसभा निवडणूक लढलो असतो तर 100 टक्के विजय प्राप्त केला असता. मात्र, अमित शाह यांनी मला निवडणूक न लढण्याची विनंती केली. ही जागा मला हवी आहे, असे शाह म्हणाले. विनाकारण माझ्यामागे ईडी लावण्यात आली. त्यामुळे मला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झाला,असेही अडसूळ म्हणाले. दरम्यान, आनंदराव आडसूळ यांनी मर्यादा ओलांडू नये, असा इशारा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
… तरीही टीका सरूच
राज्यपालपदाची ऑफर मिळाल्यानंतरही आनंदराव अडसूळ यांचे नवनीत राणांवर टीकास्त्र सुरूच आहे. अडसूळ यांचे असे ‘बाण’ राणांवर सोडणे थांबले नाहीत, तर काय होईल हे ही पाहावे लागणार आहे.