महाराष्ट्र

Flood : पालकांच्या निधनामुळे पाणावलेल्या डोळ्यातील अश्रू लगेच पुसले

Mul Taluka : भिंत कोसळल्यामुळे झाला होता दाम्पत्याच्या मृत्यू

Sudhir Mungantiwar : अतिवृष्टी, पूर आणि वादळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला आहे. अशात मुल तालुक्यातील फिस्फुटी गावात एक दुर्दैवी घटना घडली. जीर्ण झालेली भिंत कोसळल्याने गावातील अशोक रघुनाथ मोहुर्ले (वय 52) आणि लता मोहुर्ले यांचा मृत्यू झाला. मोहुर्ले दाम्पत्याला चार मुली. पण अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुलींच्या डोक्यावरील मातापित्यांचे छत्र हरवले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तातडीने सरसावले. त्यांनी प्रशासनाला कामी लावले. तत्काळ मोहुर्ले यांच्या परिवाराला मदत उपलब्ध करून देत त्यांनी चारही मुलींचे दु:खाश्रू पुसले. 

उदरनिर्वाहाचे साधन हरवले 

फिस्फुटी गावात मोहुर्ले दाम्पत्य एकटेच राहात होते. शेती हेच त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे साधन. अशात काळाने त्यांच्यावर झडप घातली. भिंत कोसळल्यानंतर ग्रामस्थांनी मोहुर्ले दाम्पत्याला मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. यासंदर्भात मुल येथील भाजप नेते नंदकिशोर ऊर्फ नंदू रणदिवे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवगत केले. मुनगंटीवार यांनी तातडीने पावले उचलत मुलच्या तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. मोहुर्ले यांची मुलगी जयश्री यांच्याशी त्यांनी फोनवरून संवाद साधला.

वडिलधाऱ्याप्रमाणे धीर

पालकमंत्री या शब्दात पालक या शब्दाचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या पालकत्वाचे कर्तव्य पार पाडत मुनगंटीवार यांनी जयश्री यांना कुंटुबातील वडिलधारी व्यक्तीप्रमाणे धीर दिला. मोहुर्ले यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्दही मुनगंटीवार यांनी दिला. केवळ शब्द देण्यापुरतेच मुनगंटीवार थांबले नाहीत. त्यांनी त्या दिशेने तातडीने पावलेही उचलली. मुलच्या तहसीलदारांना तातडीने फिस्फुटीत जाण्याची सूचना केली. तातडीने पंचनामा करावा असे सांगितले. सोबतच तातडीने मोहुर्ले यांच्या परिवाराला 20 हजार रुपयांची मदत दिली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले.

Sudhir Mungantiwar : महाराष्ट्राचा वन विभाग देशात अव्वल असावा

नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मिलिंद खोब्रागडे, राकेश ठाकरे, किशोर कापगते, प्रमोद कोकुलवार, अॅड. आझाद नागोसे, प्रवीण मोहुर्ले, फिस्फुटीचे सरपंच नितीन गुरनुले, उपसरपंच राकेश गिरडकर यांनीही मोहुर्ले यांच्या परिवाराच्या मदतीसाठी ग्रामस्तरावर पुढाकार घेतला. मोहुर्ले परिवाराला तत्काळ धीर देत मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा भावनिकतेचा परिचय दिला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करायची असो किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना उपचार, शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, मुनगंटीवार तत्काळ निर्णय, मदतीसाठी ओळखले जातात. प्रसंगी पहाटेही त्यांनी प्रशासनाला जागे केल्याचे उदाहरण आहे. मोहुर्ले यांच्या परिवारावर ओढवलेल्या दु:खद प्रसंगात तत्काळ मदतीचा हात पुढे करीत मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय चंद्रपूरवासियांना दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!