महाराष्ट्र

Mahayuti : तुमच्यासाठी सदैव राहील तत्पर, शब्द देतो तुमचाच किशोर !

Chandrapur : आमदार जोरगेवार यांचे जनतेला भावनिक पत्र

Kishore Jorgewar : 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी भाजप महायुतीकडून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा विजय झाला आहे. आता ते भाजप – महायुतीचे आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत. विजयानंतर त्यांनी भावनिक पत्र लिहून जनतेचे आभार मानले आहेत.

आमदार जोरगेवार यांच्या विजयाचा आनंद चंद्रपुरात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पण यावेळी या आनंदाला एक पुसटशी दुःखाची किनार होती. ची म्हणजे त्यांची आई – अम्मा. निवडणुकीच्या काहीच दिवसांअगोदर अम्मांचे निधन झाले. निवडणुकीवेळी अम्मांचे नसणे किशोर यांना चांगलेच अवघडले. पण अम्माचा आशीर्वाद आणि अम्माने ‘अम्मा का टीफीन’ उपक्रमातून जोडलेल्या हजारो लोकांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. असे म्हणत आमदार जोरगेवार जिद्दीने कामाला लागले आणि विजयी झाले.

पत्रात आमदार जोरगेवार म्हणतात, ‘या विजयासाठी मतदारांचे आणि महायुतीसाठी झटलेल्या नेत्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. मागील विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरकरांनी विक्रमी मताधिक्याने मला विजयी केले होते. आपले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू होताना माझी आई ‘अम्मा’चे निधन झाले. या दुःखातून सावरण्याचेही बळ आपण मला दिले.

विविध विकासाची कामे करत, सामाजिक सेवेचे उपक्रम राबवत मी जनसेवेचा ध्यास कायम बाळगला. जनतेने मतरूपी आशीर्वाद देत मला पुन्हा विधानसभेत पाठवले. जनतेचे आभार शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. तुम्ही सारे माझा परिवार आहात. परिवारातील सदस्यांचे आभार मानून औपचारिकता करणार नाही. कायम आपल्या प्रेमाच्या ऋणात राहणार.’

Kishore Kanhere : दोनदा शिवसेना सोडली; आता काँग्रेसमध्ये!

गरीबाचं लेकरू’ दुसऱ्यांदा विधानसभेत

मागील सरकारमध्ये विधानसभेच्या मुंबई येथील एका अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती. ती त्यांची पहिली वेळ होती. त्यांचा नंबर आल्यावरही अडथळे निर्माण केले जात होते. तेव्हा त्यांनी राग न येऊ देता ‘गरीबाच्या लेकराले ते बोलू द्या राजेहो..’, असे म्हणत सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर आरामात सविस्तरपणे त्यांनी मतदारसंघाचे प्रश्न, आपले म्हणणे सभागृहासमोर मांडले. तेव्हापासून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार चर्चेत आले. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील जनतेचा आवाज सभागृहात बुलंद केला. आता हे ‘गरीबाचं लेकरू’ दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलं आहे. भरपूर कामे करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. तसेच मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षाही त्यांच्याकडून वाढल्या आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!