महाराष्ट्र

Nagpur  Constituency : देवाभाऊंसाठी वहिनीही मैदानात!

Devendra Fadnavis : अमृता यांचा दक्षिण-पश्चिममध्ये प्रचार; गुडधेंच्या घरीही दिली भेट

Amruta Fadnavis : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये व्यस्त वेळापत्रकातदेखील भाजपचे उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळात वेळ काढून प्रचारासाठी जात आहेत. मात्र राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना तेथे फार वेळ देणे शक्य नाही. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यादेखील प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी मतदारसंघात मतदारांशी कनेक्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांनी मतदारसंघात गृहसंपर्क साधला. सोबतच त्यांनी प्रचार मोहिमेचा आढावा घेत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाददेखील साधला. अमृता फडणवीस यांची वेगळी फॅनफॉलोईंग आहे. एरवी अमृता या राजकारणापासून दूरच असतात. मात्र विधानसभा निवडणूकीत त्यांनी प्रचारासाठी पुढाकार घेतला आहे. मतदारसंघात जनसंपर्क अभियानाअंतर्गत अमृता फडणवीस यांनी जयताळा येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत गुडधे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांनी गुडधे कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत महिला मोर्चाच्या शहर महामंत्री अश्विनी जिचकार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा चौधरी, सोशल मीडिया संयोजिका श्रेया पाटील या उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिममधील प्रचार अभियानाचा आढावाही घेतला. तसेच त्यांनी जयताळा परिसरात मतदारांशी संपर्कही साधला.

राज्याच्या हितासाठी फडणवीस यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमृता फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत महायुतीच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेण्यासाठी नियोजन करण्याची सूचना केली.

राजकारणात नाही तरीही

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात वैय्यक्तिक टीका केली होती. या टीकांना फडणवीस यांनी तर उत्तर दिलेच होते. मात्र बहुतांश वेळा अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कधी माध्यमांशी बोलताना रोखठोक उत्तर दिले आहे. त्या सक्रीय राजकारणात नसल्या तरीही देवेंद्र यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना कायम प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असतात. बरेचदा तर त्यांची आक्रमक भूमिका बघून देवेंद्र यांनाही आश्चर्य वाटत असावे. अमृता फडणवीस यांना देखील सातत्याने विविध कारणांनी ट्रोल केले जाते, हे विशेष.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!