Amravati constituency : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्ष, युवा स्वाभिमान व 11 संघटनांच्या महिलांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. या निदर्शनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली होती. सध्या भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमानसह अनेक कार्यकर्ते राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते.
Sanjay Raut : त्यांच्याकडे शेतमालाला नव्हे तर गद्दारांना भाव
नाची बाई उल्लेखाने संताप
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मेळावा ज्ञानेश्वर संकुलात झाला. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचा नाची बाई असा उल्लेख केल्याने वाद पेटला. राऊत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता कुठले रूप धारण करतो यावर अमरावतीचे राजकारण ठरणार आहे.
महिला, कार्यकर्ते रस्त्यावर आले त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे शहराचे वातावरण तापलेले दिसले. संजय राऊत माफी मागा अशी मागणी करण्यात आली.
स्रीद्रोही वक्तव्याचा निषेध : चित्रा वाघ
सर्वज्ञानी संजय राऊत स्रियांचा सन्मान करणे महाराष्ट्र धर्म आहे. परंतु तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्वद्रोही झालात आणि स्रीचा अपमान करून स्रीद्रोही झाल्याची जळजळीत टीका भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे महिलांचा सन्मान करायचे असे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या, परंतु तुम्ही नवनीत राणा यांना नाची बाई म्हणून पातळी सोडली. तुमच्या ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद आमच्या भगिनी यशोमती ठाकूर यांनी लुटला. सर्वज्ञानी तुमच्या सारख्या शब्द पिसाटांनी केलेल्या वक्तव्याला महाराष्ट्रातील महिला माफ करणार नाही असेही चित्रा वाघ यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.