Amravati Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी 27, अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 6 उमेदवारांनी 9, बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 उमेदवारांनी 7, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 4 उमेदवारांनी 5 असे एकूण 39 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. अकोला लोकसभा मतदारसंघातून अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन), काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टीच्या वतीने दोन), अनुप धोत्रे(भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन) व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून नंदू जगन्नाथ लवंगे (अपक्ष), उद्धव ओंकार आठोळे (अपक्ष), मोहंमद हसन इनामदार (मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी), संदिप शेळके (अपक्ष), सुमन मधुकर तिरपुडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया) व रविकांत चंद्रदास तुपकर (अपक्ष दोन) नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय उत्तमराव देशमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोन), धरम दिलीपसिंग ठाकूर (सन्मान राजकीय पक्ष), संगिता दिनेश चव्हाण (अपक्ष) व विशाल शालीकराम वाघ (पक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) नामनिर्देशन अर्ज दाखल केले.अमरावती विभागात आजपर्यंत अमरावती लोकसभा मतदासंघात 30 उमेदवारांनी 39, अकोला लोकसभा मतदासंघात 12 उमेदवारांनी 16, बुलडाणा लोकसभा मतदासंघात 12 उमेदवारांनी 21 तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 8 उमेदवारांनी 13 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. असे एकूण आजपर्यंत अमरावती विभागात 62 उमेदवारांनी 89 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
Lok Sabha Election : अमरावती कोणी केली काँग्रेस विरोधात उमेदवारी दाखल?
विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे.8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.