Congress News : महाराष्ट्रातील ‘हॉट सीट’ म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे बघितले जात आहे. राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. अशातच यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्यावर सडकून टीका केली.
अमरावतीतली लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे तसेच ती ‘लँडबँक’ विरुद्ध ‘ब्रेन बँक’ अशी आहे लोकांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी योग्य व्यक्तीला मतदान करा अशा आवाहनही त्यांनी यावेळी योग्य व्यक्तीला मतदान करा असे आवाहन करीत खासदार नवनीत राणा यांच्या पाच वर्षाच्या काळावर सडकून टीका केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील इर्विन चौक येथे अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी रांग लागली. यावेळी विविध पक्षातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते बुद्धिजीवी वर्ग व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व अमरावती लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी होती.
राणांवर टीका
काँग्रेसच्या स्टार प्रचारक आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे देशात सुसूत्रता आली. समानता आली मात्र काही लोकांनी न्यायालयाच्या माध्यमातून संविधानासोबत खेळ चालवला. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. वडिलांची जात प्रमाणपत्र रद्द झाले आणि मुलीचे जात प्रमाणपत्र वैध ठरला. ही कुठली लोकशाहीची पद्धत आहे. यामुळे देशात एक चुकीचा संदेश गेला आहे, असे ठाकूर म्हणाल्या.
इंडिया आघाडी अमरावती लोकसभा मतदारसंघात तळागाळातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. सर्वसामान्य लोक आपल्या खिशातील पैसे खर्च करून वानखडे यांचा काम करत आहे. दुसरीकडे परिस्थिती फारच वेगळी आहे. अमरावती लोकसभेची लढाई ही भाजप आणि काँग्रेसचे नाहीये ही लढाई लँड बँक विरुद्ध ब्रेन बँक अशी झाली आहे अशी टीका करत आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्याला धारेवर धरले.