महाराष्ट्र

Amol Mitkari : स्वार्थासाठी जिथे गगण ठेंगणे.. ते महाभाग डॉ. राजेंद्र शिंगणे!

Rajendra Shingane : अमोल मिटकरींची जहरी टीका; सिंदखेड राजाच्या मातीत गाडायचं आहे

Political War : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यामध्ये डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तुतारीवर लढावं ही 99 टक्के कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केल्याचे स्वतः सांगितले. दोन तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही ते म्हणाले. या प्रवेशाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर जहरी टीका केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर टीका करीत आमदार शिंगणे यांच्या कारभारावर टीका करताना लक्ष्य केले आहे.

मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून टीका करताना म्हटले आहे की, ‘बुडालेल्या जिल्हा बँकेला दिला ज्यांनी थारा… दादांच्या आशीर्वादाने निधीचा कोट्यावधी पसारा… टच्च फुगलंय पोट निघतोय तुतारीच्या दारा… भोवती सगळा फिरतोय माझ्या ठेकेदारी पसारा… स्वार्थासाठी जिथे गगण ठेंगणे आहे… ते हे महाभाग डॉ. राजेंद्र शिंगणे.’

बुलढाण्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचे समजते. शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्याने प्रवास केला होता. यावेळी फाईलने त्यांनी चेहरा झाकला होता. सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे असल्याचे समोर आले होते मात्र शिंगणेंनी ते आता नाकारले आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटला आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे तसेच त्यांचे समर्थक कसे प्रत्युत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Supriya Sule : राजेंद्र शिंगणे यांचे ‘तो मी नव्हेच’!

तळ्यात…मळ्यात!

डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका मागील काही दिवसांपासून तळ्यात मळ्यातली होती. ते कधी शरद पवार यांचे गुणगान करीत होते तर थोड्याच वेळात आपण अजित पवार यांच्या सोबतच असल्याचा खुलासा करीत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सध्या आपण काठावर असल्याचे सांगून पुन्हा आपल्या चाहत्यांना बुचकळ्यात टाकले होते. मात्र आता विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अजित पवार गटातून जाण्यावर केलेल्या टिके मुळे या विषयावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!